कोणताच मुद्दा नाही म्हणून निवडणुकीआधी विरोधक…; अजित पवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा

DCM Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. बीडमध्ये बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेवर भाष्य केलं आहे. जनसन्मान यात्रेआधी अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर......

कोणताच मुद्दा नाही म्हणून निवडणुकीआधी विरोधक...; अजित पवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 8:39 AM

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. आज ही यात्रा बीडच्या परळीत असणार आहे. या यात्रेआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जसजशी निवडणूक जवळ यायला लागली आहे तसं विरोधक सातत्याने ही कंपनी राज्याबाहेर जाणार आहे. ती कंपनी राज्याबाहेर जाणार आहे, असं विरोधक म्हणत आहेत. पण तुम्ही टीव्हीवर जाहिराती पाहात असाल की कोणती कोणती कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या दाव्याला काही अर्थ नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते असे आरोप करत आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

विकासकामांवर भाष्य

दोन दिवसाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामांचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलं. किर्लोस्कर टोयोटा कंपनी जी बंगळुरुला आहे. त्यांचा ते महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. संभाजीनगरला ते नवीन प्लॅट उघडत आहेत. जेएसडब्लू आपल्याकडे 40 हजार कोटींची गुंतवणूक करत आहेत. अमरावतीला भूमिपूजन झालं आहे. त्यामुळे विरोधकांकडे काही मुद्दा नाही म्हणून ते सरकार आरोप करत आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले. राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याच्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य

2500 कोटी काल कॅबिनेटमध्ये मंजूर झाले आहेत. निवडणुकांच्या पुढे विरोधकांकडून आरोप होत आहेत. नवीन नवीन उद्योग आपल्याकडे येत आहेत. अनेक ठिकणी राज्यात गुंतवणुक होत आहेत. मुद्दे कुठले नाहीत म्हणून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. गुंतवणुकदारांना सवलती दिल्या जात आहेत. लाडकी बहिण योजनेवर विरोधकांकडून आनेक आरोप केले जातायेत. अफवा उठवण्यात येत आहे. आलेले पैसे लवकर काढून घ्या, ते परत जातील, असं काही लोक म्हणाले. काहींनी तर आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ही योजना बंद करू असंही म्हटलं. पण ही योजना महिलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामं चालू आहेत. मी विकासा बद्दल बोलतोय, कोण काय बोलतोय त्यावर मी बोलत नाही. मी काल भाषणात एकदाही विरोधकांवर टीका केला नाही. मी राज्याच्या विकासावर बोलतोय. राज्याच्या हिताची काम करण्यावर आमचा जोर आहे, असं अजित पवार म्हणाले.

विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्...
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्....