भारताच्या विद्यार्थ्याला 10 पेक्षा अधिक वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीकडून रिसर्च इंटर्नश‍िपची ऑफर

अभिषेक अग्रहरी या विद्यार्थ्यांला एकाचवेळी जगातील 10 पेक्षा अधिक प्रतिष्ठित विद्यापीठांकडून रिसर्च इंटर्नशिप ऑफर आली आहे.

भारताच्या विद्यार्थ्याला 10 पेक्षा अधिक वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीकडून रिसर्च इंटर्नश‍िपची ऑफर
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 4:35 PM

नवी दिल्ली : जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र, त्यातील मोजकेच लोक आपलं स्वप्न पूर्ण करतात. अनेकदा पैशांची अडचण येते तर अनेकदा काही इतर अडचणी तयार होतात. त्यामुळे अनेकांचं स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र दिल्लीतील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याबाबत काहीसं वेगळंच घडलं आहे. अभिषेक अग्रहरी या विद्यार्थ्यांला एकाचवेळी जगातील 10 पेक्षा अधिक प्रतिष्ठित विद्यापीठांकडून रिसर्च इंटर्नशिप ऑफर आली आहे (Delhi research student Abhishek Agrahari get 10 research internship offer from world class universities).

या भारतीय विद्यार्थ्याला 10 जगप्रसिद्ध विद्यापीठांची रिसर्च इंटर्नशिप ऑफर मिळाल्याने एक नवा विक्रम तयार झाला आहे. आता दिल्लीच्या अभिषेक अग्रहरी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप ऑफरमुळे युरोपमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अमेरिकेतील पेंसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटी आणि इलिनोइस विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी इंटर्नशिप करता येणार आहे.

अभिषेक म्हणाला, “जगातील अनेक विद्यापीठांकडून प्रस्ताव आल्याने मला खूप आनंद झालाय. माझी कठोर मेहनतीला अखेर यश मिळालं आहे.” अभिषेकने याआधी गॅस टरबाईन इंजिनवर भारताच्या डीआरडीओ (DRDO) आणि इतर संरक्षण संस्थांसोबतही काम केलं आहे. याशिवाय त्याने Fluid-structure interaction वर मुंबई आयआयटी (IIT Mumbai) आणि कानपूर आयआयटीमध्ये (IIT Kanpur) fluid dynamics वर काम केलं आहे. त्याला खरगपूर, इंदोर आणि मद्रास आयआयटीकडूनही ऑफर आलेली आहे.

20 वर्षांच्या अभिषेकच्या संशोधकवृत्तीमुळे तो दैनंदिन गोष्टींकडेही संशोधनात्मक दृष्टीने पाहतो. मला सुरुवातीपासूनच संशोधनात रस आहे. मुख्य प्रवाहात आतापर्यंत काय करण्यात आलं हे मला आवडत नाही. मला या मुख्य प्रवाहाच्या संशोधनापलिकडे जाऊन नवं काहतरी शोधायचं आहे. मला फ्ल्युड, ब्लॅक होल, कडक ऊन, गडद सावली अशा विषयांवर काम करण्यास आवडते, असं अभिषेक सांगतो.

डीआरडीओ आणि आयआयटीसारख्या संस्थांसोबत काम केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम काम करण्याची वेळ आली आहे. मुलभूत सुविधा देण्याबाबत जागतिक स्तरावरील विद्यापीठं काही प्रमाणात पुढे आहेत. आपल्याकडे जे काम सुरु आहे त्या तुलनेत त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता जास्त आहे, असंही मत अभिषेकने व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :

ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्यामुळे शिक्षण रथातून धडे; शहादा येथील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

खेड्यात ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा, मोबाईलसाठी विद्यार्थी मजुरीला

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

Delhi research student Abhishek Agrahari get 10 research internship offer from world class universities

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.