बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन

दिलीपकुमार यांचे 92 वर्षांचे भाऊ एहसान खान यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले.

बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांचा दुसरा भाऊ अस्लम खान यांचाही अवघ्या बारा दिवसांपूर्वी (21 ऑगस्ट) मृत्यू झाला होता. 16 ऑगस्ट रोजी दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. (Dilip Kumar Younger Brother Ehsan Khan Dies of COVID-19 Complications)

एहसान खान 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कोरोना संसर्गाप्रमाणेच त्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि अल्झायमर असल्याची माहिती लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांनी दिली.

“दिलीप साब यांचे धाकटे भाऊ एहसान खान यांचे काही तासांपूर्वी निधन झाले. यापूर्वी सर्वात धाकटा भाऊ अस्लम यांचे निधन झाले होते. आपण देवाकडून आलो आहोत आणि त्याच्याकडे परत जातो. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा” असे दिलीपकुमार यांच्या वतीने ट्विटरवर पोस्ट करण्यात आले आहे.

(Dilip Kumar Younger Brother Ehsan Khan Dies of COVID-19 Complications)

याआधी, 88 वर्षीय अस्लम खान यांचेही लीलावती रुग्णालयात निधन झाले. कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याशिवाय त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होता.

श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाल्याने 15 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा एहसान खान आणि अस्लम खान या दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिलीपकुमार यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी वृत्त्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. “डॉक्टर जलील पारकर आणि हृदय रोग तज्ज्ञ नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत आहेत” असे सायरा बानू यांनी सांगितले होते.

97 वर्षीय दिलीपकुमार यांना घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून ते सुखरुप आहेत.

संबंधित बातमी :

दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे निधन, 88 व्या वर्षी अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन, दोघा भावांना कोरोनाची लागण 

(Dilip Kumar Younger Brother Ehsan Khan Dies of COVID-19 Complications)

Published On - 10:15 am, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI