AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharati Singh | ड्रग्जच्या प्रकरणात अडकल्यामुळे भारती सिंहच्या अडचणीत वाढ, ‘कपिल शर्मा’मधूनही हकालपट्टी?

कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh)आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे गेल्या काही दिवसांपासून ड्रगच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.

Bharati Singh | ड्रग्जच्या प्रकरणात अडकल्यामुळे भारती सिंहच्या अडचणीत वाढ, ‘कपिल शर्मा’मधूनही हकालपट्टी?
| Updated on: Nov 28, 2020 | 6:29 PM
Share

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh)आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे गेल्या काही दिवसांपासून ड्रगच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. भारतीला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सोमोरे जावे लागत आहे सर्व स्तरातून भारतीवर आता टिका होऊ लागली आहे. यामुळे सोनी टीव्हीने आता भारतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे.(Drugs case sony tv banned Bharati Singh singh from the kapil sharma show) आता, भारती कपिल शर्माच्या शोमध्ये कधीही दिसणार नाही. केवळ कपिल शर्मा शोमध्येच नाही तर, भारती आणि तिचा नवरा सोनीच्या कोणत्याही शोमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. या निर्णयामुळे भारतीचा खास मित्र, अभिनेता कपिल शर्मा चिडला असल्याचे कळते आहे. कपिलचे म्हणणे असे आहे की, सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये. चॅनेलने या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेले नाही. परंतु सूत्रांचे म्हणणे आहे की, सोनी टीव्ही नेहमीच त्यांच्या चॅनेलची प्रतिमा “स्वच्छ” राखण्याचा प्रयत्न करते. त्यांचा विश्वास आहे की, सोनी टीव्ही एक फॅमिली चॅनेल आहे आणि कपिल शर्मा शो हा फॅमिली शो आहे. त्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी चॅनेलची इच्छा आहे. कपिल शर्माच्या अडचणीच्या वेळी भारती सिंगने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. अलीकडे, जेव्हा कपिल आजारी पडला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शोवर होत होता. त्यावेळी भारतीने त्याची मदत केली होती. कपिल आणि भारती दोघेही पंजाबचे आहेत. कपिल भारतीला त्याची छोटी बहीण मानतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी हा शो भारतींकडून काढून घेतला जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे. सोनी टीव्हीने एखाद्या कलाकाराशी बंदी घालण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीसुद्धा सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिकवर अनेक सेलिब्रिटींनी ‘मीटू’ आरोप केले तेव्हा, सोनी टीव्हीने त्यांना चॅनलमधून बाहेरचा मार्ग दाखविला होता. एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले होते.

या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले होते. यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला होता. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली.

संबंधित बातम्या :

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी भारती सिंहच्या कर्मचार्‍यांचीही चौकशी करू शकतात!

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी

(Drugs case sony tv banned Bharati Singh singh from the kapil sharma show)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.