AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका; दमानिया यांचं राज्यपालांना साकडं

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद संपण्याची चिन्हं नाहीत. एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी आता थेट राज्यपालांकडे धाव घेतली असून खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका; दमानिया यांचं राज्यपालांना साकडं
| Updated on: Oct 31, 2020 | 7:19 PM
Share

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद संपण्याची चिन्हं नाहीत. एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी आता थेट राज्यपालांकडे धाव घेतली असून खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनतर दमानिया यांच्या या मागणीमुळे खडसेंच्या संभाव्य आमदारकीवर गंडातर येतं की काय? अशा चर्चा राजकीय गोटात सुरु झाल्या आहेत. (Eknath Khadse is corrupt don’t make him MLA demands Anjali Damania)

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात दमानिया यांनी तक्रारदेखील दाखल केली आहे.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर खडसेंची राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची जोरदार चर्चा आहे. त्यांचे नाव आमदारकीसाठी जवळजवळ निश्चित मानले जात आहे. अशातच अंजली दमानिया यांनी खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये; असे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. दमानिया यांनी खडसेंवर पुन्ह एकदा गंभीर आरोप केले आहेत. ‘खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार करु नये’ अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

खडसेंच्या वादग्रस्त विधानाबाबत शरद पवारांना फोन केला; पण…

यावेळी माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ‘राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसेंनी माझ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्याकडे खडसेंबाबतची तक्रार केली होती. पण पवारांनी खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला’, असा दावा दमानिया यांनी केला आहे. तसेच, एकनाथ खडसे यांनी वृत्तवाहीन्यांसमोर माझी बदनामी केली. खडसेंविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही; असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सर्व पुरावे दिले असून अधिकचे पुरावेही लवकरच देणार आहे. तसेच, न्यायलयीन लढाई देखील सुरच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही; दमानिया यांचा इशारा

खडसेंच्या अ‍ॅक्शनमुळे राष्ट्रवादीची चांदी, हळूहळू ‘असा’ लागेल भाजपच्या गडाला सुरूंग

…तर टीआरपी घोटाळा सीबीआयकडे गेला असता; अनिल देशमुख यांचा दावा

(Eknath Khadse is corrupt don’t make him MLA demands Anjali Damania)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.