Rajeev Masand | सुशांतच्या सिनेमांचं निगेटिव्ह विश्लेषण, पत्रकार राजीव मसंद यांची दहा तास चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आज पत्रकार राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला.

Rajeev Masand | सुशांतच्या सिनेमांचं निगेटिव्ह विश्लेषण, पत्रकार राजीव मसंद यांची दहा तास चौकशी
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 11:27 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आज पत्रकार राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला. राजीव यांनी सुशांत सिंहविरोधात अनेक आर्टिकल लिहले, कार्यक्रम केले. याबाबत राजीव यांचा जबाब नोंदवण्यात आला. सुमारे दहा तास त्यांची चौकशी करण्यात आली (Film Critic Rajeev Masand Inquiry For 10 Hrs In Sushant Singh Rajput Suicide Case).

राजीव मसंद हे वरिष्ठ पत्रकार आहेत. मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या मूल्यांकनाला महत्त्व आहे. नवे चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतात, त्यावेळी त्यांच्याबाबत राजीव मसंद यांच्या समीक्षेला महत्व आहे. राजीव यांनी सुशांत सिंहच्या चित्रपटाबाबतही अनेकदा क्रिटिक्स केलं आहे. बऱ्याचदा त्यांनी सुशांत सिंहच्या चित्रपटाबाबत निगेटिव्ह कार्यक्रम केले आहेत, लिहलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गेल्या तीन ते चार वर्षांपासून राजीव सतत सुशांतच्या चित्रपट विरोधात लिखाण करत आहेत. राजीव मसंद यांनी 2017 मध्ये सुशांतच्या स्वभावाबद्दल लिहलं होतं. सुशांत हा मुलींच्या मागे असतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या मुलींच्या आई त्यांच्यावर आणि सुशांतवर लक्ष ठेवून असतात. यावेळी सुशांतबाबत त्यांनी ‘स्कर्ट चेसर’ अर्थात मुलीच्या मागे असणारा असा उल्लेख केला होता.

2016 मध्ये आलेला सुशांतचा ‘एम. एस. धोनी’ हा चित्रपट हिट झाला होता. 2017 मध्ये त्याचा ‘राबता’ चित्रपट आला. त्यानंतर 2018 मध्ये सुशांतचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट आला. हा चित्रपटही हिट झाला होता. लोक सुशांतचे चित्रपट डोक्यावर घेत होते. दुसरीकडे मात्र, समीक्षक सुशांतवर टीका करत होते (Film Critic Rajeev Masand Inquiry For 10 Hrs In Sushant Singh Rajput Suicide Case).

सुशांतचे चित्रपट हिट होत असल्याने सुशांतचा भाव वधारला होता. त्याला आता प्रत्येक चित्रपटासाठी सात कोटी रुपये इतकं मानधन मिळू लागलं होतं. याबाबत 2018 मध्ये राजीव मसंद यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं. त्यात ‘या बाहेरच्या व्यक्तीला एवढे पैसे कसे काय मिळू शकतात’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

2019 मध्ये सुशांतचे ‘ड्राईव्ह’, ‘सोन चिडया’ आणि ‘छिछोरे’ हे तीन चित्रपट आले. यापैकी ‘छिछोरे’ हा चित्रपट सुपरहिट झाला. सुशांतची चलती असताना त्याच्या पुढच्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबाबत निगेटिव्ह चर्चा सुरु झाली होती. त्याचा आगामी चित्रपट ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अनेक अडचणी येत होत्या. चित्रपटाचा हिरो सुशांत असल्याने त्याला टॉकीज मिळत नाहीत, अशी मोठी चर्चा होती. याबाबत काही ब्लाइंड आर्टिकलही छापून आले होते. या प्रकारात राजीव मसंदही आघाडीवर होते, अस म्हटलं जातं होतं.

सुशांतला नेहमी वाटायचं की, आपल्या विरोधात कुणी तरी आहे. ते आपल्या विरोधात बातम्या, ब्लाइंड आर्टिकल छापून आणत आहेत. पण त्याने कधी कोणाचं नाव घेतलं नाही. पोलीस आता याच अँगलने तपास करत आहेत.

आपल्या विरोधात कुणी आहे. ते आपल्या विरोधात काम करत आहेत, असं सतत त्याला वाटायचे. यामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने आत्महत्या केली का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सुशांतच्या विरोधात बातम्या छापणारे पोलिसांना माहित आहेत. पण सुशांतच्या विरोधात या बातम्या छापणाऱ्यांच्या मागे कुणी आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. याच अनुषंगाने राजीव मसंद यांची चौकशी झाली.

Film Critic Rajeev Masand Inquiry For 10 Hrs In Sushant Singh Rajput Suicide Case

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकश

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला अश्लील भाषेत धमकी, दोघा इन्स्टाग्राम युझर्सविरोधात गुन्हा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.