पुण्यात कोरोनामुक्तीचा जल्लोष अंगलट, डीजे लावून नाचणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल

लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्याने कोरोनामुक्तीचा जल्लोष करत थेट डीजे लावत डान्स केला (FIR for Celebrating cure from Corona infection in Pune).

पुण्यात कोरोनामुक्तीचा जल्लोष अंगलट, डीजे लावून नाचणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल

पुणे : एकिकडे कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत, तर दुसरीकडे अक्षम्य हलगर्जीपणाचीही उदाहरणं समोर येत आहेत. पुण्यातील लोणी काळभोर येथे असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्याने कोरोनामुक्तीचा जल्लोष करत थेट डीजे लावत डान्स केला (FIR for Celebrating cure from Corona infection in Pune). विशेष म्हणजे यात या रुग्णासह त्याचे मित्र आणि नातेवाईकही विना मास्क सहभागी होत नाचले. मात्र, प्रशासनाने या प्रकरणी 16 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पुण्यात लोणी काळभोर येथील माजी ग्रामपंयात सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर मागील 10 दिवसांपासून हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना बुधवारी (1 जुलै) उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबाने ते बरे झाल्याच्या आनंदात थेट डीजे लावून स्वागत केले. यावेळी डान्स करताना उपस्थितांनी शारीरिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आणि इतर अनेक नियमांची पायमल्ली केली.

कोरोनामुक्तीनंतरच्या या जल्लोषाचा व्हिडीओ देखील काढण्यात आला. हा व्हिडाओ सोशल मीडियावर व्हायरला झाल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या 16 जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या हे सर्वजण 14 दिवस होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे विलगीकरणाचा काळ संपल्यावरच संबंधितांवर पोलीस कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (3 जुलै) 1199 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 143 वर पोहचली आहे. काल दिवसभरात उपचारानंतर बरे झालेल्या 792 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 16 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात 16 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा 822 वर पोहचला आहे.

पुणे मनपा हद्दीत शुक्रवारी दिवसभरात 807 नवीन बाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत पुणे मनपा क्षेत्रात एकूण 19, 849 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 685 एवढी झाली. काल 619 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 12,290 जण कोरोनामुक्त झाले. सध्या पुण्यात 6874 सक्रिय रुग्ण आहेत, तर 389 गंभीर असून 59 व्हेंटिलेटर आहेत.

हेही वाचा :

पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर

वसई-विरार क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 220 रुग्ण

MLA Corona | अहमदनगरमधील काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

FIR for Celebrating cure from Corona infection in Pune

Published On - 9:05 am, Sat, 4 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI