जमावबंदीचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा, तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यासह 7 जणांवर गुन्हा नोंद

उस्मानाबादमध्ये नियमांचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (FIR registered against priest of Tuljabhavani temple).

जमावबंदीचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा, तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यासह 7 जणांवर गुन्हा नोंद
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 6:10 PM

उस्मानाबाद : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलनंतरही 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, असं असतानाही उस्मानाबादमध्ये नियमांचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (FIR registered against priest of Tuljabhavani temple).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करणं तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा यांना चांगलंच भोवलं आहे. गर्दी जमवून मास्क न घालता वाढदिवस साजरा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे महंत तुकोजीबुवा , महंत वाकोजी बुवा यांच्यासह 7 जणांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महंत तुकोजी बुवा यांचा वाढदिवस साजरा करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

महंत तुकोजी बुवा यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला. यावेळी महंत वाकोजीबुवा, अॅड संजय पवार, तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी आणि इतर 3 जणांनी तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वापरले नाही. शिवाय सोशल डिस्टन्सच्या नियमांचंही पालन न करता बेकायदेशीरपणे जमाव जमवला. त्यांनी आपल्या वाढदिवसाचा 11 सेकंदचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावरही पोस्ट केला. सुरज जगताप या नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. पोलिसांनी या व्हिडीओच्या आधारे या सर्व व्यक्तींविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम 188, 269 आणि महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम 2020 कलम 11 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

जिथे आहे तिथेच थांबा; तुमच्या राहण्या-खाण्याची हमी आमची : अनिल देशमुख

पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

FIR registered against priest of Tuljabhavani temple

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.