AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आतापर्यंतची सर्वात भीषण आग, 50 कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू

ऑस्ट्रेलियामधील जंगलामध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी आग लागली आहे (Australia Forest Fire killed 50 crore animals). अनेक दिवसांपासून हे अग्निकांड सुरु आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आतापर्यंतची सर्वात भीषण आग, 50 कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू
| Updated on: Jan 06, 2020 | 12:59 PM
Share

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : जागतिक पातळीवर एकीकडे वैश्विक तापमान वाढीचा मोठा प्रश्न आ वासून उभा असताना पर्यावरणीय ऱ्हासाच्या गंभीर घटना घडत आहेत. अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीच्या घडनेचे पडसाद अजूनही सुरु आहेत. त्यातच आता ऑस्ट्रेलियामधील जंगलामध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी आग लागली आहे (Australia Forest Fire killed 50 crore animals). अनेक दिवसांपासून हे अग्निकांड सुरु असून यात जवळपास 50 कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेचे अनेक फोटो व्हायरल होत असून जगभरातून याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

View this post on Instagram

#Regram @worldeconomicforum: Australian bushfires are creating a terrifying weather phenomenon. 3 people have already died. #environment #fires #wildlife #sydney #australia

A post shared by Leonardo DiCaprio (@leonardodicaprio) on

ऑस्ट्रेलियातील जंगलात मागील 4 महिन्यांपासून अग्नितांडव सुरु आहे. मात्र, तरिही अद्याप ऑस्ट्रेलियातील जंगलातील आग नियंत्रणात आलेली नाही. यूनिवर्सिटी ऑफ सिडनीच्या पर्यावरण तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आतापर्यंत जवळपास 50 कोटी प्राण्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. यात सस्तन पशु, पक्षी आणि सरपटणाऱ्या जीवांचाही समावेश आहे.

कोआला प्राण्यांच्या संख्येत मोठी घट

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-मध्य न्यू साऊथ वेल्स भागात सर्वाधिक कोआला प्राणी राहतात. कोआला हे ऑस्ट्रेलियाच्या जंगलात राहणारे शाकाहारी सस्तन प्राणी आहेत. ते झाडांवर राहतात. मात्र, सध्या लागलेल्या आगीमुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

या आठवड्यात 200 हून अधिक घरं नष्ट

ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमधील आगीने या आठवड्यात 200 हून अधिक घरं जाळून राख केली. तरिही अनेक लोक आजही आगीने वेढलेल्या भागात अडकलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या हंगामात लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये जवळपास 18 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती काही अहवालांमध्ये सांगण्यात आली आहे. ही संख्या पुढे वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

विक्टोरियामधील पूर्व जीप्सलँडमध्ये 43, न्यू साऊथ वेल्समध्ये 176 घरं आगीमुळे उद्ध्वस्त झाली. बुधवारी (1 जानेवारी 2020) न्यू साऊथ वेल्स रुरल फायर सर्विसने म्हटलं की या हंगामात 916 घरं उद्ध्वस्त झाली, तर 363 घरं काही प्रमाणात आगीमुळे जळाली.

प्रसिद्ध पर्यावरणवादी हॉलीवूड स्टार लिओनार्डिओ दी कॅप्रिओचंही आवाहन

प्रसिद्ध पर्यावरणवादी हॉलीवूड स्टार लिओनार्डिओ दी कॅप्रिओ यांनीही ऑस्ट्रेलियाच्या आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच या आगीचं गांभीर्य सांगणारे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. लिओनार्डिओ यांनी यासोबत इंडोनेशियात आणि अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीबद्दलही काळजी व्यक्त केली आहे.

जंगलाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून सुरु होणारा आपला 4 दिवसीय भारत दौरा रद्द केला आहे. आपण आगामी काळात योग्यवेळी पुन्हा एकदा भारत दौऱ्याचं नियोजन करु, असंही मॉरिसन यांनी सांगितलं आहे. 13 जानेवारीपासूनच्या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार होते.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.