Gadchiroli LPG Crisis | गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील बिकट परिस्थिती समोर!
एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वस्तीगृहातील मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे 150 मुलींसाठी दररोज जेवण तयार केले जाते, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे.
एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहातील मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे 150 मुलींसाठी दररोज जेवण तयार केले जाते, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.
या अडचणीत भर म्हणजे लाकडाचीही कमतरता भासत असून, चुलीसाठी आवश्यक इंधन मिळवणे कठीण झाले आहे. स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धूर, उष्णता आणि वेळेच्या मर्यादेमुळे अडचणी येत आहेत. वेळेत अन्न तयार करणे अवघड होत आहे. त्यामुळे मुलींच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. आता प्रशासन यावर नेमके कोणते उपाय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

