18 लाखांचं बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

जाभुळखेडा भुसुंरग सफोटाचा मास्टमाईंड दिनकर गोटा आणि त्याची दुसरी पत्नी सुनंदा कोरेटी यांना पोलिसांनी अखेर अटक केली.

18 लाखांचं बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोली : जाभुळखेडा भुसुंरग सफोटाचा मास्टमाईंड दिनकर गोटा आणि त्याची दुसरी पत्नी सुनंदा कोरेटी यांना  (Gadchiroli Naxal Arrest) पोलिसांनी अखेर अटक केली. गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने बुधवारी (4 मार्च) पहाटे गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन या नक्षलवाद्यांना अटक केली. याबाबत गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली. विषेश म्हणजे या दोघांवर तब्बल 18 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय कमिटी तसेच कोरची (Gadchiroli Naxal Arrest) दलमच्या डिव्हीसीएम पदावर कार्यरत असलेला दिनकर गोटा आणि त्याची दुसरी पत्नी सुनंदा कोरेटी जी कोरची दलमच्या सदस्य पदावर कार्यरत होती. या दोन्ही नक्षलवाद्यांना गोपनीय माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, आता नव्या डेथ वॉरंटची प्रतीक्षा

कुरखेडा तालुक्यातील मौजा दादापूर येथे नक्षलींनी 36 वाहने जाळली होती. यानंतर 1 मे 2019 रोजी नक्षल्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे 15 जवान आणि 1 खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. या घटनेच्या मुख्य सुत्रधारापैकी एक दिनकर गोटा आहे.

दिनकर गोटा हा 2005 मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. यानंतर 2006 मध्ये चातगाव दलम, 2007 मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी मेंबर, 2008 मध्ये धानोरा दलममध्ये कमांडरपदी कार्यरत, 2011 मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी सचिव, 2016 पासून कोरची दलममध्ये उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या विभागीय समिती सदस्य पदावर तो कार्यरत होता. एकूणच गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात त्याचा दबाव होता. दिनकर गोटा याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील विविध पोस्टे, उपपोस्टे आणि पोमके येथे एकूण 108 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात 33 खुनांचा समावेश आहे. त्याचबरोबर 2009 साली मरकेगाव चकमकीत त्याचा सहभाग होता. मौजा दादापूर येथील वाहनांची जाळपोळ आणि 1 मे 2019 रोजी मौजा जांभूळखेडा येथे भूसुरूंग स्फोट घडविण्यात तो मुख्य सुत्रधार आहे. दिनकर गोटा गडचिरोली पोलिसांच्या हाती लागल्याने पोलिसांना मोठं यश प्राप्त झालं आहे.

हेही वाचा : सामूहिक बलात्कारानंतर 6 वर्षीय मुलीची हत्या, कल्याणमध्ये पकडलेल्या आरोपीला 24 दिवसात फाशीची शिक्षा

जाांभूरखेडा आणि दादापूर घटनेची रेकी आणि प्लॅनिंगमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर त्याची पत्नी सुनंदा कोरटी यांच्यावर एकुण 18 लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

एक आठवड्यापूर्वी 28 फेब्रुवारी 2020 रोजी पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्यासमोर उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत असलेला विलास कोल्हा याने एके-47 शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते. तर नुकतेच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले होते. जांभुळखेडा घटनेतील 8 आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने यापुर्वीच अटक केलेली असून घटनेचा संपूर्ण तपास करुन तपास एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलीस दलाने नक्षलींच्या उत्तर गडचिरोली डिव्हीजनचा विभागीय समितीचा सदस्य असलेला आणि दादापूर, जांभुळखेडा घटनेत प्रमुख भूमिका बजावलेल्या कुख्यात नक्षली दिनकर गोटा याला अटक केल्याने गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद्यांना जबर धक्का देण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठ यश मिळालं आहे.

हेही वाचा : मेव्हणीच्या प्रेमात, भाऊजी तुरुंगात

नक्षली दिनकर गोटा आणि सुनंदा कोरेटी दोघ्यांना दादापूर कुरखेडा येथील वाहनं जाळपोळ प्रकरणी पुराडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन आज न्यायलयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची प्राााथमिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनकर गोटा याला अटक करणाऱ्या विशेष पोलीस तपास पथकाच्या पोलीस अधीक्षकांनी शैलैश बलकवडे यांचं अभिनंदन केले असून या संपूर्ण विशेष पोलीस पथकास पारितोषिक जाहिर केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli Naxal Arrest) नक्षली संघटनांना या सर्व पोलीस कारवाईमुळे जबर दणका बसला आहे.

Published On - 11:21 pm, Wed, 4 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI