निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, आता नव्या डेथ वॉरंटची प्रतीक्षा

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता याची दया याचिका (Mercy petition) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली

निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, आता नव्या डेथ वॉरंटची प्रतीक्षा
Follow us
| Updated on: Mar 04, 2020 | 5:12 PM

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता याची दया याचिका (Mercy petition) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी फेटाळून लावली. त्यामुळे तुरुंग प्रशासन आज (4 मार्च) न्यायालयाला याबाबत माहिती देऊन नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची विनंती करणार असल्याचं तिहार तुरुंगाच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं.

निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gang Rape Case) आरोपी पवन कुमार गुप्ता याची दया याचिका (Mercy petition) मंगळवारी (3 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पवन कुमारच्या याचिकेवर न्यायमूर्ती एन.वी. रमना, अरुण मिश्रा, आरएफ नारिमन, आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी हा निर्णय दिला.

हेही वाचा : निर्भया बलात्कार प्रकरण : नराधमांची फाशी तिसऱ्यांदा टळली

पवन कुमार गुप्ताने शुक्रवारी (28 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी (29 फेब्रुवारी) या दया याचिकेच्या आधारे त्याने पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज देत 3 मार्चला होणारी फाशी रद्द करण्याची मागणी केली. पटियाला हाऊस न्यायालयाने या याचिकेवर तिहार प्रशासनाकडून उत्तर मागवलं होतं.

हेही वाचा : निर्भया बलात्कार प्रकरण : अखेर दोषींच्या फाशीची नवी तारीख ठरली

पवनव्यतिरिक्त इतर तीन आरोपी मुकेश, अक्षय आणि विनय यांचे न्यायालयीन पर्याय संपले आहेत. या तिघांचीही दया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर राष्ट्रपतींनीही यांची दया याचिका फेटाळून लावली.

2012 मध्ये निर्भयावर गँगरेप

दिल्लीत 16 डिसेंबरच्या रात्री फिजिओथेरपीची 23 वर्षीय विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपी राम सिंहने प्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर तिहार तुरुंगात आत्महत्या केली. तर आरोपी किशोरला तीन वर्ष सुधारगृहात (Mercy petition) ठेवल्यानंतर 2015 मध्ये त्याला सोडण्यात आलं.

हेही वाचा : निर्भया प्रकरण : भिंतीवर डोकं आपटून दोषी विनय जखमी, पुन्हा फाशी टळण्याची भीती

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.