लोखंडी रॉडने गॅरेज चालकाची हत्या करुन कार पळवली; 20 दिवसांतील हत्येची दुसरी घटना

लोखंडी रॉडने गॅरेज चालकाची हत्या करुन कार पळवली; 20 दिवसांतील हत्येची दुसरी घटना

गॅरेज चालकाची हत्या करून अज्ञात चोरट्यांनी गॅरेजमधील कार पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

prajwal dhage

|

Nov 12, 2020 | 9:32 PM

नाशिक : गॅरेज चालकाची हत्या करून अज्ञात चोरट्यांनी गॅरेजमधील कार पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. (garage owner murdered by Iron rod second murder in 20 days)

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा पाथर्डी रस्त्यावरील श्रीजी प्लाझा अपार्टमेंट शेजारी रामचंद्र निसाद यांचे गुरुपकृपा नावाचे गॅरेज आहे. रात्रीच्या सुमारास गॅरेजमध्ये एकटे असल्याने डाव साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॅडने प्रहार केला. या हल्ल्यात रामचंद्र निसाद गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन गॅरेजमधील वर्णा कारही पळवली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना कळताच पोलिसांच्या डॉग स्कॉड पथकाने या परिसराची पाहणी केली आहे. काही सुगावा लागतो का याचा शोध इंदिरानगर पोलीस घेत आहेत. दरम्यान परिसरात हत्येचं थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. मागील 20 दिवसांतील हत्येची ही दुसरी घटना असल्यामुळे परिसरातील नागरिकांत भीती आहे. तसेच ओरोपींना तत्काळ पकडावे अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीत पाळीव कुत्र्याला खाऊ घालणं महागात, रॉट व्हिलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू

बर्फीत भेसळ, कारखान्यावर धाड, 1 लाख 19 हजारांची बर्फी जप्त

cybercrime | अ‌ॅप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने 9 लाखांना चुना

(garage owner murdered by Iron rod second murder in 20 days)

 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें