AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

.. तर तुकाराम मुंढेंविरोधातील काँग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ : भाजप

सर्वसाधारण सभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी-विरोध आमनेसामने येणार आहेत. (BJP on Tukaram Mundhe General Meeting)

.. तर तुकाराम मुंढेंविरोधातील काँग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ : भाजप
| Updated on: Jun 20, 2020 | 2:42 PM
Share

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमधील आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या सर्वसाधारण सभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी-विरोध आमनेसामने येणार आहेत. (BJP on Tukaram Mundhe General Meeting) आयुक्तांनी सर्वसाधारण सभेला नकार दिल्यानंतर राज्य सरकारने सभेला परवानगी दिली. यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून तुकाराम मुंढे यांना घेरण्याची तयारी होत असल्याचं दिसत आहे. भाजपने काँग्रेसने आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

नागपूरमधील स्थितीवर बोलताना भाजप आमदार प्रवीण दटके म्हणाले, “आयुक्तांना घाबरायचं काय कारण आहे हे मला माहित नाही. आयुक्तांना सभागृहाला सामोरं जायला काय अडचण आहे मला माहित नाही. नागपूर महापालिकेतील नगरसेवक काही गुंड नाहीत. सभागृहात नेहमी चांगली चर्चा झाली आहे. काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणत असेल आणि नागपूरच्या भल्यासाठी असेल तर त्यांचं 100 टक्के समर्थक करु.”

राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेला फिजीकल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांचं पालन करण्याचे बंधनकारक करुन सभा घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान याआधी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सभा घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे सभा घेण्यावरुन नागपूरात आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापालिका लोकप्रतिनिधी असा वाद रंगला होता. त्यातच आता राज्य सरकारने महापालिकेची सभा घेण्याची परवानगी दिल्याने सत्ता पक्ष भाजपात आनंद संचारला आहे.

नगरसेवकांकडून वैयक्तिक आरोपानंतर तुकाराम मुंढेंचा सभात्याग

सत्ता पक्ष आयुक्तांना घेरण्याची आणि त्याला विरोधकांचीही साथ मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. ही सभा आज सुरेश भट सभागृहात झाली. दरम्यान, सभेत तुकाराम मुंढे यांच्यावर नगरसेवकांनी वैयक्तिक टीका करत आरोप केले. यानंतर तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला आहे. नगरसेवकांच्या आरोपांनंतर मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघाले. अशाप्रकारे वादाची पार्श्वभूमी असलेली ही सभा वादळी ठरली आहे.

या सर्व परिस्थितीवर नागपूरचे महापौर संदीप जोशी म्हणाले, “आयुक्तांनी विरोध केलेल्या सभागृहाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृह होत आहे. राज्य सरकारने सभागृहाला मंजुरी दिल्याने तुकाराम मुंढेंना चपराक बसली आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अजून कोणीही अविस्वास प्रस्ताव दिलेला नाही. नियमानुसार सभा सुरु होण्याच्या 1 तास आधीपर्यंत प्रस्ताव यावा लागतो. मात्र, अद्याप अजून कोणीही प्रस्ताव दिलेला नाही.”

दुसरीकडे युवक काँग्रेस आणि आम आदमी पक्ष महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थानात रस्त्यावर उतरला आहे. एकीकडे युवक काँग्रेसचं आंदोलन, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचं, असं चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळालं. यावेळी ‘तुकाराम मुंढे आगे बडो’च्या घोषणाही देण्यात आल्या.

संबंधित बातम्या :

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप

नागपुरात तुकाराम मुंढेंना शिवसेनेची खंबीर साथ, भाजप-काँग्रेसचा मात्र कडाडून विरोध

हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’

नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण

BJP on Tukaram Mundhe General Meeting

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.