बहिणीच्या लग्नाला पाठिंबा दिल्याचा राग,  नातवाकडून डोक्यात दगड घालून आजीची हत्या

क्षुल्लक कारणामुळे नातवाने आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली (Grandson Killed Grandmother)  आहे.

बहिणीच्या लग्नाला पाठिंबा दिल्याचा राग,  नातवाकडून डोक्यात दगड घालून आजीची हत्या

नागपूर : क्षुल्लक कारणामुळे नातवाने आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली (Grandson Killed Grandmother)  आहे. राऊलाबाई गणवीर (70) असे मृत आजीचे नाव आहे. नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्याची हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली (Grandson Killed Grandmother) आहे.

काल (2 मार्च) रात्र मानवतानगर या ठिकाणी एका बाईचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना धक्कादायक माहिती समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊलाबाई गणवीर या आपल्या नातू लकी सुंदर गणवीर आणि नातीसह राहत होत्या. गिट्टीखदान परिसरातील मानवता नगरमधील झोपडपट्टीत हे तिघेही राहत होते. तिच्या नातीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या लग्नाला घराच्यांची परवानगी (Grandson Killed Grandmother) होती.

मात्र नातू लकी याला ते लग्न मान्य नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आजी आणि बहिणीसोबत त्याचे नेहमी खटके उडत. तो नेहमी यावरुन त्याच्या आईसोबत भांडण करत.

काल (2 मार्च) रात्रीही अशाचप्रकारे त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी आजीने नातीची बाजू घेत नातवाला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा राग डोक्यात ठेऊन नातवाने आजीच्या डोक्यात दगडाने वार केला. यात आजीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणानंतर पोलिसांनी नातवाला अटक केली आहे. मात्र घरगुती आणि क्षुल्लक कारणाने ही हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच राग अनावर झाल्यावर काय होते ते त्या घटनेवरुन दिसून येत  (Grandson Killed Grandmother) आहे.

संबंधित बातम्या : 

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा चिरला, खून करुन तरुणी स्वत: पुणे पोलिसात हजर

सोलापुरात बापलेकीच्या नात्याला काळिमा, जन्मदात्याचा चिमुरडीवर बलात्कार, आईची तक्रार

Published On - 4:16 pm, Tue, 3 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI