AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय वायूसेना आणखी सक्षम, HAL चं लढाऊ हेलिकॉप्टर तयार

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सध्या भारत नवनवीन प्रयोग करत आहे. दिवसेंदिवस आपल्या सुरक्षा उपक्रमांत वाढ होते आहे. शत्रूशी दोन हात करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) वजनाने हलके असलेले लढाऊ हेलिकॉप्टर (एलसाएच) तयार करण्यात यश प्राप्त केले आहे. हे हेलिकॉप्टर आकाशातच शत्रूंच्या विमानांना मिसाईलने नष्ट करण्यात सक्षम आहेत. विशेष म्हणजे, या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे आकाशात […]

भारतीय वायूसेना आणखी सक्षम, HAL चं लढाऊ हेलिकॉप्टर तयार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM
Share

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सध्या भारत नवनवीन प्रयोग करत आहे. दिवसेंदिवस आपल्या सुरक्षा उपक्रमांत वाढ होते आहे. शत्रूशी दोन हात करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) वजनाने हलके असलेले लढाऊ हेलिकॉप्टर (एलसाएच) तयार करण्यात यश प्राप्त केले आहे. हे हेलिकॉप्टर आकाशातच शत्रूंच्या विमानांना मिसाईलने नष्ट करण्यात सक्षम आहेत. विशेष म्हणजे, या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे आकाशात हालचाल करत असलेल्या टार्गेटवरही अचूक निशाणा साधता येतो. लवकरच हे हेलिकॉप्टर भारतीय वायूसेनेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

‘देशात पहिल्यांदाच असं लढाऊ हेलिकॉप्टर तयार करण्यात  आलंय, ज्यातून आकाशातूनच शत्रूच्या विमानावर हल्ला शक्य आहे. या लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे शस्त्रांसंबंधीचे सर्व परीक्षण पूर्ण झाले आहे. आता हे ऑपरेशन सेवांसाठी पूर्णपणे तयार आहे’, अशी माहिती एचएएलचे प्रमुख आर. माधवन यांनी दिली.

ओदिशाच्या चांदीपूर परीक्षण क्षेत्रावर या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे यशस्वी परीक्षण घेण्यात आल्याची माहिती एचएएलचे प्रवक्‍ता गोपाल सुतर यांनी दिली. या परीक्षणादरम्यान हेलिकॉप्टरने यशस्वीरीत्या आपल्या ध्येयावर हवेत मिसाईलने निशाणा साधला. या परीक्षणात पायलट विंग कमांडर सुभाष पी जॉन (वीएम रिटायर्ड), एचएएलचे फ्लाईट इंजिनियर कर्नल रंजीत चितळे, भारतीय वायुसेनेचे टेस्‍ट पायलट ग्रुप कॅप्‍टन राजीव दुबे सहभागी होते.

मागील वर्षी या हेलिकॉप्टरने 20 एमएमची शक्तीशाली टुरेट गन आणि 70 एमएमच्या रॉकेटचेही यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर एकमेव असे हेलिकॉप्टर आहे, जे सियाचीनसारख्या दुर्मिळ उंची असलेल्या ठिकाणांवरही कार्य करण्यास समक्ष असल्याचा दावा एचएएलने केला आहे.

या हेलिकॉप्टरला एचएएलच्या रोटरी विंग रीसर्च अँड डिझाईन सेंटरने डिझाईन आणि विकसित केले आहे. याला भारतीय वायुसेनेच्या गरजा लक्षात घेत बनवण्यात आले आहे. याच्या वरील भागात विशेष इंफ्रारेड  साइटिंग सिस्‍टम लावण्यात आली आहे. यामुळे आत बसलेल्या पायलटला जमिनीवर आणि आकाशात असलेल्या शत्रूच्या कुठल्याही ठिकाणावर किंवा ध्येयावर निशाणा लावण्यात मदत मिळते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणं असेलेल्या या हेलिकॉप्टरला पायलट न वळवताही निशाण्यावर मिसाईल सोडू शकतो. यातील मिसाईल हे मानवरहित विमान (यूएव्ही) तसेच अनेक लहान विमानांना नष्ट करण्यात सक्षम आहे. विपरित परिस्थितीतही हे हेलिकॉप्टर उडू शकतं. त्यासोबतच खालच्या उंचीवरही उडू शकतं.

डिफेंस एक्‍विजिशन काउंसिल (डीएसी)ने सध्या असे 15 हेलिकॉप्टर विकत घेण्यास मान्यता दिली आहे. यापैकी 10 हे भारतीय वायुसेना तर 5 भारतीय लष्कराला दिले जातील.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.