आरसीबीच्या विजयात हर्षल पटेल चमकला, घेतली जबरदस्त हॅट्रीक, पाहा VIDEO

आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ मुंबई इंडियन्सला विराटच्या आरसीबीने पाणी पाजलं आहे. आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार त्यांचा पर्पल कॅप होल्डर गोलंदाज हर्षल पटेल ठरला.

आरसीबीच्या विजयात हर्षल पटेल चमकला, घेतली जबरदस्त हॅट्रीक, पाहा VIDEO
हर्षल पटेल
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 12:03 AM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL 2021) या जगातील सर्वात मनोरंजनात्मक क्रिकेट लीगमध्ये रविवारचा (26 सप्टेंबर) म्हणजेच यंदाच्या हंगामातील 39 वा सामना धमाकेदार ठरला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (RCB vs MI) या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 54 धावांनी तगडा विजय मिळवला. या विजयाच सिंहाचा वाटा उचलला तो आरसीबीचा यंदाच्या हंगामात मुख्य गोलंदाज ठरल असलेल्या हर्षल पटेलने (Harshal Patel). हर्षलने जबरदस्त हॅट्रीक घेत मुंबईची मजबूत अशी शेवटची फलंदाजी संपूर्णपणे भेदून टाकली.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने कर्णधार विराट कोहली (51) आणि ग्लेन मॅक्सवेल (56) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 165 धावापर्यंत मजल मारली. ज्यानंतर 166 धावांच आव्हान मुंबईसमोर होतं. मुंबईचा तगडा संघ पाहता त्यांच्यासाठी हे आव्हान पार करणं तसं फार अवघड नव्हता. सुरुवातही उत्तम झाली होती. पण सलामीवीर डिकॉक बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. मुंबईला हा मोठा झटका बसला. ज्यानंतरच्या खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का काढला.

हर्षलची जबरदस्त हॅट्रीक

विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दीकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचीत करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीला विजय सोपा झाला. संपूर्ण सामन्याचा विचार करता हर्षलने 3.1 ओव्हर टाकत केवळ 17 धावा दिल्या आणि एकूण 4 विकेट्स घेतल्या.

हर्षल ठरला तिसरा हॅट्रीकवीर

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी संघाकडून हॅट्रीक घेणारा हर्षल तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वात आधी प्रवीण कुमारने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध, त्यानंतर सॅम्युयल बद्रीने 2017 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रीक घेतली होती. त्यानंतर आता हर्षलनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रीक घेतली आहे.

हे ही वाचा

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

IPL 2021: वॉर्नर-विलियमसनला बाद करत मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या

(Harshal Patels Hat trick let RCB won Match Over Mumbai indians with 54 runs)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.