AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | आरोग्य भरतीचा पेपर लातूरमधूनच फुटला ; पुणे पोलिसांनी उपसंचालकाच्या आवळल्या मुसक्या

आरोग्य विभागाच्या लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुंबई डॉक यार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची वाढली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे आता आरोग्य विभागापर्यंत पोहचले आहेत.

मोठी बातमी | आरोग्य भरतीचा पेपर लातूरमधूनच फुटला ; पुणे पोलिसांनी उपसंचालकाच्या आवळल्या मुसक्या
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 7:38 PM
Share

पुणे – आरोग्य भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलीसांनी पेपर फुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य विभाग लातूरमधील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना ताब्यात घेतलं आहे. प्रशांत बडगिरे याने पेपर फूटीसाठी 5 ते 10 लाख रुपये घेतल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

अशी केली अटक सायबर पोलिसांनी लातूर येथील उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेंनी पेपर पुरविल्याचे तसेच सदर पेपरसाठी त्यांचेच आरोग्य विभागातील डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड यांचेकडून 10 लाख रु व शिपाई शाम महादू मस्के याचेकडून 5 लाख रुपये घेतल्याचे तपासामध्ये उघड झाले. या प्रकरणातील आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे याने पेपर कसा व कोठून मिळविला त्याचा तपास सुरू आहे.

यापूर्वी आरोग्य विभागाच्या लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुंबई डॉक यार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची वाढली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे आता आरोग्य विभागापर्यंत पोहचले आहेत.

असे होते रेटकार्ड

आरोग्य भरतीचा पेपर देण्याच्या बदल्यात एका उमेदवाराकडून जवळपास 6 ते 7 लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यापैकी 50 हजार रूपये आरोपींना मिळणार होते. बाकीची रक्कम त्यांना वरती द्यावी लागणार होती. उमेदवारांचे यादीत नाव आल्यानंतर त्यानंतर ते पैसे देणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ठेवून घेतली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून उमेदवारांची मूळ कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, विजय पळसुले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली व पो. नि. तथा तपासी अधिकारी डी. एस. हाके, पो उपनि. अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नवनाथ जाधव, नितीन चांदणे, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलीक, सुनिल सोनवणे या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Sanjay Raut| फ्रंट एकच असायला पाहिजे, नेतृत्व नंतर ठरेल; राहुल गांधींच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेना यूपीएत असणार का? पुढील 24 तासांत सांगणार, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Breaking | कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस द्यावा; आदित्य ठाकरेंचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.