AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मान्सूनची जोरदार वाटचाल, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह अनेक ठिकाणी मुसळधार

राज्यभरात आज मान्सून पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला (Heavy Mansoon rain in Maharashtra ).

राज्यात मान्सूनची जोरदार वाटचाल, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह अनेक ठिकाणी मुसळधार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 13, 2020 | 4:29 PM
Share

मुंबई : राज्यभरात आज मान्सून पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला (Heavy Mansoon rain in Maharashtra ). अहमदनगर, औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर वसई-विरारमध्ये संततधार पाऊस आला. भारतीय हवामान खात्याने आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे.

अहमदनगरमध्ये देखील जोरदार पाऊस झाला. सकाळपासून येथे ढगाळ वातावरण होते. अखेर दुपारपासून जोरदार पावसाचं आगमन झालं. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली. राज्यभरातील या पावसाने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे शेतात पेरण्यांना वेग आहे.

दरम्यान, कुलाबा वेधशाळेच्या वरिष्ठ सहाय्यक नीता यांनी सांगितलं, “पुढच्या 48 तासात मुंबईत मुसळधार पावासाची शक्यता आहे. आगामी 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होईल. मध्य महाराष्ट्र, कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. सध्या मुंबई आणि इतर भागात पावसाची शक्यता आहे. वसईच्या ग्रामीण भागात 2 दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पावसाची संततधार सुरू झाली आहे. आज (13 जून) दुपारी दीडपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.

औरंगबादेमध्ये देखील पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. सिल्लोड सोयगाव परिसरात अनेक भागात नद्यांना पूर आला आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात शुक्रवारी (12 जून) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. शहादा तालुक्यात 2 जण जखमी झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील शुक्रवारी दिवसभरात मुसळधार पाऊस कोसळला. सावंतवाडी तालुक्यात 213 मिमी पावसाची नोंद झाली. पहिल्याच मुसळधार पावसाने सावंतवाडीतील प्रसिध्द आंबोली धबधबा दुथडी भरून वाहू लागला.

सिंधुदुर्गात मागील 24 तासात मुसळधार पाऊस पडला. रात्री या पावसाने आणखीनच जोर पकडला होता. मात्र सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 154 मिमी पाऊस पडला. या पावसाने जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांमध्ये 150 मिमी पावसाची सरासरी पार केली आहे. यात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 225 मिमी, तर सावंतवाडी तालुक्यात 213 मिमी पावसाची नोंद झाली. देवगड 176 , कणकवली 153 आणि मालवण तालुक्यात 195 मिमी पाऊस पडला. पुणे शहरात देखील अनेक ठिकाणी पावसाची संततधार पडली. शहराचा मध्यवर्ती भाग त्याचबरोबर उपनगरात पावसाच्या या सौम्य सारी कोसळल्या. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान पाहायला मिळत होतं.

हेही वाचा :

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन

हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’

Pandharpur Corona | जपानवरुन पंढरपुरात आलेला चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह

600 रुपयांची मृतदेह बॅग 6,719 रुपयांना कशी? सोमय्यांचा मुंबई मनपावर अंत्यसंस्कार घोटाळ्याचा आरोप

Heavy Mansoon rain in Maharashtra

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...