Mumbai Rain : मुंबईत कोसळधार, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, लोकल ट्रेन अडकल्या

Mumbai Rain : मुंबईत कोसळधार, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, लोकल ट्रेन अडकल्या

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह कोकणात जोरदार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला (Mumbai Rain Live Update) आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 06, 2020 | 7:12 AM

मुंबई : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत (Mumbai Rain Live Update) आहे. मुंबईत दुपारी सोसाट्याच्या वाऱ्याने घबराट पसरली. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह कोकणात जोरदार पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या सर्व ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट  दिला आहे. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Live Update

[svt-event date=”05/08/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

  • मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह कोकणात जोरदार पाऊस कायम राहण्याचा अंदाज, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

[svt-event title=”पाणी साचलेल्या ठिकाणी जाऊ नका, मुंबई पोलिसांचे आवाहन” date=”05/08/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”05/08/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

🛑 महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी NDRF च्या 15 टीम तैनात

🔹मुंबई – 5 🔹कोल्हापूर – 4 🔹सांगली – 2 🔹सातारा -1 🔹ठाणे – 1 🔹पालघर – 1 🔹नागपूर – 1

एकूण – 15

[svt-event title=”मुंबईत कोसळधार, महापौर किशोरी पेडणेकरांकडून पूर परिस्थितीचा आढावा” date=”05/08/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत लोकल रुळावर पाणी, भायखळा-मशिद दरम्यान ट्रेन ठप्प” date=”05/08/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवले” date=”05/08/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे काही मार्गावरील बेस्ट बस बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही बसचे मार्ग वळवण्यात आले आहेत

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील जे. जे रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले” date=”05/08/2020,7:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पालिकेकडून पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था” date=”05/08/2020,7:21PM” class=”svt-cd-green” ] बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.  [/svt-event]

[svt-event title=”न्हावा शेवा बंदरातील जेएनपीटीमध्ये वादळी वाऱ्यासह तीन क्रेन कोलमडल्या” date=”05/08/2020,7:19PM” class=”svt-cd-green” ] जेएनपीटीमध्ये वादळी वाऱ्यासह तीन क्रेन कोलमडल्या चोवीस तास सुरु राहिलेल्या मुसळधार पावसासह वादळी पावसामुळे जेएनपीटीमध्ये तीन क्रेन कोलमडल्या, जेएनपिटीच्या मुख्य धक्क्यावरील क्रेन क्रमांक 6,7, 8 या कोलमडून पडल्या. सुदैव म्हणजे या वेळी धक्क्यावर एक ही जहाज लागलेले नव्हते.

[/svt-event]

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगर

मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबई उपनगरात जोरदार पाऊस पडला. दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली गोरेगााव अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसाचा चांगलाच परिणाम झालेला दिसला. जोरदार पावसाने वातावरण इतकं अस्पष्ट झालं होतं की गाडी चालकांना लाईट लावून गाडी चालवावी लागली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुणे

पुणे शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. आज पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. घाट माथ्यावर पावसाच्या सरींचा जोर वाढणार असल्याने शहर आणि परिसरात ‘आँरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला. शहर आणि परिसरातील काही भागात पुढील 24 तासांमध्ये पावसाच्या मध्यम सरी (15.6 ते 64.4 मिलीमीटर) पडतील. त्याच वेळी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल. तेथे मुसळधार (64.5 ते 115.5 मिलीमीटर) पाऊस पडेल. शहराच्या परिसरातील घाट भागात मात्र, मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सलग 2 दिवस पडणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण परिसरात सोमवारी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. चारही धरणात मिळून 9.82 टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणी साठ्यात वाढ होऊन तो 10.66 टीएमसी झाला.

पुण्यात धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस, एका दिवसात सव्वा महिना पुरेल इतका पाणीसाठा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. धरण क्षेत्रात एका दिवसात सव्वा महिना पुरेल इतका पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे साठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला धरण प्रकल्पात 12.07 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

असाच पाऊस सुरु राहिल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 टीएमसी पाणीसाठा यंदा कमी आहे. गणेशोत्सवानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. (Mumbai Rain Live Update)

वसई विरार

वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय आहे. नालासोपारा पूर्व सेन्ट्रलपार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु होता. अजूनही पावसाचा जोर कायम आहे.

मिरा भाईंदर

मिरा भाईंदरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मिरा रोड, काशीमिरा, भाईंदरच्या अनेक सखल भागात पाणीच पाणी आहे. सोसायटी, घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली आहेत. काशिमिरा निळकंठ बिल्डिंग परिसरात सर्वत्र पाणी पाणी, मिरा रोडच्या शांतीनगर, विजय पार्क, सिल्वर पार्क परिसरात पाणी सोसायटीत दाखल, भाईंदरच्या केबिन रोड, गीता नगर बेकरी गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.

भिवंडीत ठिकठिकाणी पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला (Heavy Rain in Maharashtra live updates).

पालघर

पालघर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागासह शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरुन वाहत असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रात्रभर पावसाच्या संततधार सुरु असल्याने नदी काठच्या गावातील अनेक घरात पाणी शिरुन घरांचे नुकसान झाले आहे. तलासरी, डहाणू, येथील अनेक नदी काठच्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे तर तलासरी मधील कोचाई येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 जणांना नागरिकांनी वाचवण्यात यश आलं आहे.

पालघर-माहीम रोडवरील पानेरी नदीला पूर आल्याने पालघर माहीम रस्ता पाण्याखाली गेला आहे. वडराई येथील 53 वर्षीय व्यक्ती आपली सायकल घेऊन पालघरकडे येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. हे लक्षात येताच त्यांनी आपली सायकल सोडून दिली आणि पुलाच्या कठड्याचा आधार घेत शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर चढले. मात्र, ही बाब त्या रस्त्याने जात असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांच्या आणि पोलिस मित्राच्या मदतीने अथक एक तासाच्या परिश्रमाने दोरखंड बांधून 53 वर्षीय काकांना सुखरुप बाहेर काढले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

रायगड

माणगाव तालुक्यातील सोन्याची वाडीतील ग्रामस्थांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु. 70-75 नागरिक या ठिकाणी अडकले असून माणगाव तालुक्यातील साळुंखे रेस्क्यू टीमचे पोलीसांसोबत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे

गोरेगाव पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सोन्याची वाडीला काळ नदीच्या पुराच्या गावाच्या चोहोबाजूंनी पुराचे पाणी आल्याने या गावांमध्ये 70 ते 75 लोक अडकले होते. रायगड पोलीसांनी साळुंखे रेस्क्यू टीमसोबत बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत 23 ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविले असून इतरांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

प्रशांत साळुंखे, प्रणित साळुंखे, प्रजित साळुंखेंसह महेश सानप आणि इतर रेस्क्यू एक्सपर्टने बोटीच्या साहाय्याने ग्रामस्थांना हलविण्यात महत्वाचा सहभाग नोंदवला.

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदी रात्रीपर्यंत इशारा पातळीच्या पुढे जाण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली येथील ग्रामस्थांनी स्थलांतराला सुरुवात केली आहे.

गेल्यावर्षी या दोन्ही गावांना महापुराचा मोठा फटका बसला होता. गावाच्या स्थलांतराच्या आवाहनासाठी प्रशासकीय अधिकारी चिखली गावात पोहोचले आहेत. जनावर आणि अन्य प्रापंचिक साहित्य हलवायच्या कामाला वेग आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरण 90 टक्के भरलं आहे. शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नंदगाव इथल्या प्राथमिक शाळेत पाणी शिरले, तर कोवाड बाजारपेठही जलमय झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सलग 2 दिवस दमदार पाऊस कोसळतो आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. कोयना धरणातील पाणीसाठ्यात 6 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरण पाणीसाठा आता 60.18 टीएमसी इतका झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाथरपुंजला 296 मिमी, कोयना 227 मिमी, नवजा 288 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस कोसळला. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती तयार झाली आहे. काजळी नदीला पूर आला आहे. चांदेराई बाजारपेठेत तर मागील 24 तासांपासून पाणी आहे. राजापूर तालुक्यातील अजुर्ना आणि कोदावली नदीला देखील पूर आला आहे. राजापूर बाजारपेठेत 3 फुटांपर्यंत पाणी आहे. जवाहर चौकात देखील अशीच स्थिती आहे. सुरक्षेसाठी बंद केलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पुलावरुन वाहतूक सुरु होणार आहे. दोन्ही बाजूकडून एकेरी वाहतूक सुरु होणार आहे. महामार्ग प्रशासनाने याबाबत माहिती दिली.

कोकणात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस पडतो आहे. चिपळूण शहरातील शिवनदी आणि वाशिष्टी नदीला पूर आला आहे. चिपळूण शहरातील मच्छिमार्केट, जुना बाजारपूल, भाजीमार्केट परिसरात पाणी शिरलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी या भागात पाणी भरलं आहे.

सिंधुदुर्ग

जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी अनेक नद्यांना पूर आला आहे. कुडाळ येथील भंगसाळ नदीला मोठा पूर आल्यामुळे पुराचे पाणी वस्तीमधे घूसून तळ्याचे स्वरुप आले आहे.

कुडाळ लक्ष्मीवाडी काळप नाका येथील घराला पाण्याने वेढा घातला होता. यावेळी घरात अडकलेल्या कांबळी कुटूंबातील पाच जणांना कुडाळ पोलीसांच्या रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. यावेळी तीन श्वानही या घरात अडकले होते, त्यांनाही बाहेर काढण्यात यश आले आहे. (Mumbai Rain Live Update)

सातारा

जोरदार पावसाने पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील पवारवाडी-कसणी गावादरम्यानचा वांगनदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे 25 वाड्यावस्त्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे.

जोरदार पावसाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील पवारवाडी-कसणी गावादरम्यानचा वांगनदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने मेंढ,निवी, कसणी,निगडे, घोटीलसह अतिदुर्गम 25 वाड्यावस्त्यांचे दळणवळण ठप्प झाले आहे. कमी उंचीच्या पुलामुळे प्रत्येक पावसाळ्यात या गावांना पावसाळ्यात या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. याठिकाणी नागरिक जीव धोक्यात घालुन पुल ओलडंण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सोलापूर

सोलापूर शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच सोलापुरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहाराबरोबर ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरु झाला आहे.

सांगली

सांगली जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर, चांदोली परिसरात मागील 24 तासात अतिवृष्टी झाली असून एकूण 140 मीमी पाऊस झाला आहे. तर वारणा धरण 70 टक्के भरलं आहे. त्यामुळे वीज निर्मिती सुरु करण्यात आली आहे. वीज निर्मितीसाठी 950 क्यूसेक्स पाणी धरणातून सोडलं जात आहे. शिराळा तालुक्यात वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काखे मांगले आणि कोकरुड रेठरे पुल पाण्याखाली गेला आहे.

जालना

जालन्यात मुसळधार पावसाची हजेरी. अर्धा तास मुसळधार पाऊस बरसला. नाल्याला पूर आल्याने घाण पाणी रस्त्यावर आलं. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाले आहे.

अहमदनगर

उत्तर नगर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपलं आहे. येथे मुसळधार पाऊस आहे. ‌‌‌ओढे, नाले भरुन वाहत आहेत. रस्त्यांवरही पाणी साचलं आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा.

मुक्ताईनगरातही जोरदार पाऊस 

मुक्ताईनगर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी होते. मात्र, आज दिलासादायक पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन माणगाव शहराच्या अलीकडे घोड नदीवरील कळमजे या पुलावरुन पुराचे पाणी वाहू लागल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करुन सदरची वाहतूक कोलाड नाकाच्या पुढे भिरा नाका येथून हलकी वाहने तसेच जड वाहतूक वळवण्यात आली आहे. सदर वळवलेली वाहने माणगाव एसटी स्टँड समोर निजामपुर नाका येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर येऊन तिथून पुढे वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मुंबई दिशेने येणारी वाहतूक देखील माणगाव येथील निजामपूर नाका येथून वळविण्यात आलेली आहे.

हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती बंद

मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे सीएसएमटी-वाशी दरम्यान सीएसएमटी-कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. (Mumbai Rain Live Update)

संबंधित बातम्या :

Ayodhya Ram Mandir Photos: भूमिपूजनाच्या आधीच अयोध्‍येत दिवाळी, योगींनी फटाके फोडले, तर शिवराज चव्हाणांची रुग्णालयात पूजा

Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापर्यंत अयोध्या पूर्णपणे सील, SPG-NSG जवानांचा कडा पहारा

Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan | पारिजातकाचे वृक्षारोपण, 12.44 च्या मुहूर्तावर भूमिपूजन, पंतप्रधान मोदींचा दिवसभरातील कार्यक्रम काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें