16 वर्षांनंतर हिरोची करिझ्मा भारतीय बाजारातून हद्दपार होणार

तरुणांमध्ये क्रेझ असलेली Hero Karizma बाईकचे प्रोडक्शन कंपनी (Hero stop karzma production) बंद करत आहे, असं सांगितलं जात आहे.

16 वर्षांनंतर हिरोची करिझ्मा भारतीय बाजारातून हद्दपार होणार
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 8:32 PM

मुंबई : तरुणांमध्ये क्रेझ असलेली Hero Karizma बाईकचे प्रोडक्शन कंपनी (Hero stop karzma production) बंद करत आहे, असं सांगितलं जात आहे. हीरो मोटोकॉर्पची पहिली प्रिमिअम मोटरसायकल म्हणून Karizma कडे पाहिले जाते. कंपनीने जारी केलेल्या आकड्यानुसार, एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान Karizma एकही यूनिट तयार करण्यात (Hero stop karzma production) आलेले नाही.

Karizma बाईक लाँच झाल्यापासून मोठ्या प्रमाणात या बाईकला तरुणांकडून पसंती दिली जात होती. होंडा कंपनीने 2003 मध्ये Karizma बाईक हीरो (हीरो कंपनी) लाँच केली होती. त्यावेळी या बाईकला प्रीमिअम बाईकमध्ये मोजले जात होते. लाँच झाल्यानंतर कमी कालावधीत या बाईकच्या विक्रीत वाढ झाली होती.

त्यावेळी या बाईकचे ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून अभिनेता ह्रतिक रोशन होते. ह्रतिकचा त्यावेळी ‘कोई मिल गया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ह्रतिकचे अनेक हिट चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि तो भारतातील एक मोठा स्टार अभिनेता होता. ह्रतिकने “Jet Set Go” या टॅगलाईनसह Karizma ची जाहिरात केली होती. ज्यामध्ये Karizma बाईकचा स्पीड आणि त्याची पॉवर क्षमता दाखवली जात होती. त्यावेळी Karizma बाईकची सर्व तरुणांमध्ये क्रेझ होती.

पुढच्या वर्षी 2020 च्या नवीन उत्सर्जन मानक बीएस 6 लागू होत आहे. यामध्ये Karizma या नव्या मानकामध्ये बसत नाही. तसेच Karizma चे इंजिन बीएस 6 मध्ये अपग्रेडही करु शकत नाही. त्यामुळे बाईकचे प्रोडक्शन बंद होत आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान आम्ही Karizma बंद करणार नाही. परदेशात या बाईकची निर्यात सुरु राहिल. असे या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने सांगितले होते.

या बाईकमध्ये 200 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन लावले होते. जे 8000 आरपीएमवर 20 बीएचबी आणि 6500 आरपीएमवर 19.7 एनचा टॉर्क जनरेट करते. तसेच बाईकमध्ये 5 स्पीड गिअर इंजिन दिले आहे. बाईकच्या सिंगल टोनची किंमत 1 लाख 8 हजार आणि ड्युअल टोन शेडची किंमत 1 लाख 10 हजार 500 रुपये होती.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.