हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विक्की नगराळेविरोधात 26 दिवसात 426 पानांचं आरोपपत्र दाखल

हिंगणघाट प्राध्यापिका जळीतकांड आणि मृत्यू प्रकरणी आरोपी विक्की नगराळेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विक्की नगराळेविरोधात 26 दिवसात 426 पानांचं आरोपपत्र दाखल
Follow us
| Updated on: Feb 28, 2020 | 6:53 PM

वर्धा : हिंगणघाट प्राध्यापिका जळीतकांड आणि मृत्यू प्रकरणी (Charge Sheet Against Vicky Nagrale) आरोपी विक्की नगराळेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. घटनेच्या 26 दिवसात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. हे प्रकरण ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम हाताळत आहेत.

426 पानांचे आरोपत्र दाखल

घटनेच्या 26 दिवसात संपूर्ण तपास करुन आरोपी विक्की नगराळेविरोधात (Charge Sheet Against Vicky Nagrale) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात 302,307,326 (अ), 354 (ड) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपपत्र तब्बल 426 पानांचं आहे. हे आरोपपत्र आज (28 फेब्रुवारी) हिंगणघाटच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

पोलिसांनी आरोपीकडून घटनेत वापरण्यात आलेलं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. यात त्याचा मोबाईल, लायटर, कपडे, दुचाकी, शूज आणि पेट्रोलची छोटी बॉटल याचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या (Charge Sheet Against Vicky Nagrale) पोलीस स्टेशनमध्ये नेत तपास केला.

संबंधित बातम्या :

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ शब्द पाळला

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, उज्ज्वल निकमांचंही काम सुरु : गृहमंत्री

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न : सूत्र

हिंगणघाट जळीतकांड : डाईंग डिक्लेरेशन कायदा दोषीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.