Corona | कोल्हापुरात कोरोनाची एण्ट्री कशी झाली?

हा संबंधित पुरुष मूळचा पुण्याचा, मात्र पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने तो आपल्या नातेवाईकांकडे कोल्हापुरात आला होता.

Corona | कोल्हापुरात कोरोनाची एण्ट्री कशी झाली?
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 6:02 PM
कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना नाही म्हणतां म्हणता (How Corona Entered In Kolhapur) तीन दिवसात तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढलीआहे. त्यातच सिपीआरमधील कोरोना कक्षातील संशयितांचा अहवाल येण्याआधीच (How Corona Entered In Kolhapur) मृत्यू झाल्याने यंत्रणेची धाकधूक वाढली आहे.
गेल्या 26 मार्चला कोल्हापुरातील पेठ वडगाव इथल्या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर अवघ्या काही तासात मूळचा पुण्याचा असलेला पण कोल्हापुरातील नातेवाईकांकडे आलेल्या पुरुष संशयिताचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता या संशयिताच्या कोल्हापुरातील बहिणीला देखील कोरोना झाला असल्याचं काल रात्री आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झालं.
कोल्हापुरात कोरोनाची एण्ट्री
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूरला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने आपली एन्ट्री केली. बघता बघता इथल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यायला सुरुवात केली. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा आणि मंदिर प्रशासनाने बंद केली. मात्र, 26 मार्चला पेठ वडगाव मधील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि जिल्ह्यात कोरोनान एन्ट्री केली.
इस्लामपूर मधील या महिलेच्या नातेवाईकांना दोन दिवसांपूर्वी म्हणजे 24 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं, त्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात आल्याने या महिलेला देखील कोरोना झाला होता. मिरज येथे केलेल्या वैद्यकीय तपासणीत ही बाब समोर आली. इतके दिवस जिल्ह्यात शिरकाव न करु शकलेल्या कोरोनाने आपलं खातं उघडलं आणि अवघ्या काही तासात आणखी एका रुग्णाचा अहवाल (How Corona Entered In Kolhapur) पॉझिटिव्ह आला.
हा संबंधित पुरुष मूळचा पुण्याचा, मात्र पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने तो आपल्या नातेवाईकांकडे कोल्हापुरात आला होता. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यानंतर केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली. यानंतर प्रशासनाने संबंधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या कोल्हापुरातील नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी केली यामध्ये बारा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, त्याच्या बहिणीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला आणि जिल्ह्यात तिसऱ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
तिन्ही रुग्णांचा परदेश दौऱ्याचा इतिहास नाही
जिल्ह्यातील या तिन्ही रुग्णांचा परदेश दौऱ्याचा इतिहास नाही. मात्र, कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता पेठ वडगाव मधील आजूबाजूच्या 13 गावांचे सर्वेक्षण प्रशासनाने सुरु केले, तर कोल्हापुरातीलही संबंधित कुटुंबाच्या घराच्या आवारात औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच, रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कोरोना म्हणजे ‘कोल्हापुरात रोग नाही’
सांगली सातारा इथं कोरोनाने धडक दिली. तरी तो कोल्हापुरात येऊ शकला नव्हता, त्यावेळी कोरोना म्हणजे ‘कोल्हापुरात रोग नाही’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली. मात्र, 26 मार्चच्या सायंकाळी हा दावा खुद्द कोरोनानच  फोल ठरवला. कोल्हापूरात कोरोना (How Corona Entered In Kolhapur) येणार नाही अशा भलत्या आत्मविश्वासात असणाऱ्यांना देखील यामूळे धडा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :

शाळा सुरु होईपर्यंत फी घेऊ नका, अन्यथा कारवाई : वर्षा गायकवाड

संगमनेरमध्ये एकाचवेळी तब्बल 15 कोरोना संशयित रुग्ण, संपर्कात आल्याने संसर्गाची चिन्हं

एसटी बंद, महिनाअखेर आला, पगार कसा? एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मोठा प्रश्न सुटला

साताऱ्यातील मोदी पेढेवाल्यांना लॉकडाऊनचा फटका, कंदी पेढे रस्त्यावर फेकण्याची वेळ

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.