बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन कसे शूट करतात?

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन कसे शूट करतात?

बोल्ड सीन, हॉट सीन, इंटिमेट सीन हे एव्हाना सिनेरसिकांच्याही रोजच्या वापरातील शब्द झाले आहेत. शिवाय, अनेक सिनेनिर्माते, दिग्दर्शक अशा सीनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या एका विशिष्ट वर्गाला सिनेमा पाहण्यासाठी ‘उद्युक्त’ करत असतात. पोस्टर, टीझर, ट्रेलर इत्यादींमधूनही असे आकर्षक सीन दाखवून, प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न होतो. अर्थात, हे अडल्ट फिल्म्ससाठी केले जाते. मात्र, गंभीर विषयांवरील सिनेमांमध्येही अनेकदा असे बोल्ड सीन असतातच. अर्थात, तो विषयानुरुप कथेचा भाग असतो. मात्र, हे सीन नेमके कसे शूट केले जातात, याची उत्सुकता आणि कुतूहल नक्कीच सगळ्यांना असते. काही उदाहरणांवरुन आपल्याला लक्षात येईल किंवा एक अंदाज येईल की, बोल्ड सीन नेमके कसे शूट केले जातात.

राधिका आपटेचा न्यूड सीन – दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका शॉर्ट फिल्मची जोरदार चर्चा झाली होती. कारण यात अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड सीन केला होता. या शूटसाठी अनुरागने सर्व तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक म्हणून स्त्री निमंत्रित केली होती. आजूबाजूला स्त्रिया असताना राधिकाचा हा सीन शूट झाला होता.

सनी लिओनीचा ‘एक पहेली लीला’ – बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनीने अत्यंत हॉट आणि बोल्ड सीन या सिनेमात दिले होते. सनी लिओनीसोबत सहकलाकार रजनीश दुग्गल होता. रजनीशसोबतच्या इंटिमेट सीनबाबत त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. मात्र, तुम्हाला माहितंय का, तो सीन करताना सनी लिओनीसोबत रजनीश दुग्गल नव्हता, तर सनीचा पती म्हणजेच डॅनियल वेबर हा होता. डॅनियलसोबत सनी लिओनीने इंटिमेट सीन शूट केला होता.

प्रियांका चोप्राचा ‘सात खून माफ’ – अभिनेता इरफान खानसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक अत्यंत बोल्ड सीन शूट केला होता. याही सीनची अर्थात त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. त्यावेळीही प्रियांकाने स्वत: हा सीन केला नव्हता, तर तिच्या जागी तिची बॉडी डबल होती.

रिया सेनचा ‘डार्क चॉकलेट’ – या सिनेमात अभिनेत्री रिया सेनच्या एका सीनने मोठी खळबळ माजवली होती. शीना बोरा हत्याकांडावर बनवण्यात आलेल्या या सिनेमात रियाच्या अंगावर कपडे नसल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, हा सीन प्रत्यक्षात शूट केला गेला नव्हता, तर ती कॅमेऱ्याची कमाल होती.

सोहाचा ‘चारफुटिया छोकरे’ – या सिनेमात अभिनेत्री सोहा अली खानचा एक सीन आहे. त्यामध्ये खलनायक सोहावर जबरदस्ती करत असून, तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. हा सीन सोहाच्या विनंतीवरुन निर्माती विभा दत्ता खोसला यांनी बंद खोलीत शूट केला होता.

खळबळ माजवणारा मनीषा कोईरालाचा सीन – अभिनेत्री मनीषा कोईरा हिच्या ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ या सिनेमाने देशात एकच खळबळ उडवून दिली होती. यात मनीषा कोईरालाने इंटिमेट सीन केला होता. मात्र, या सीनसाठी मनीषाने बॉडी डबलचा वापर केला होता.

करिना कपूरचा ‘तलाश’ – या सिनेमात अभिनेत्री करिना कपूरवर खलनायक बलात्काराचा प्रयत्न करतो आहे, असा एक सीन शूट केला गेला होता. त्यावेळीही बॉडी डबलचा वापर करण्यात आला होता.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI