भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात…..

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्चचे प्रमुख पद्मश्री रमण गंगाखडेकर यांनी वटवाघूळ आणि कोरोना संसर्ग याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (ICMR on Corona Viruses in Bat and Human Infection).

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात.....
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 6:43 PM

नवी दिल्ली : भारतात दोन प्रकारच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात भारतात या वटवाघळांमुळेच कोरोना विषाणू पसरला का असाही प्रश्न विचारला जात आहे. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्चचे प्रमुख पद्मश्री रमण गंगाखडेकर यांनी उत्तर दिलं आहे (ICMR on Corona Viruses in Bat and Human Infection). भारतात वटवाघळामुळे कोरोना आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रमण गंगाखेडकर म्हणाले, “भारतामध्ये वटवाघळमुळे कोरोना आला नाही किंवा पसरलाही नाही. भारतातील दोन प्रकारच्या वटवाघळांवर संशोधन करण्यात आले. या दोन्ही वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. मात्र, तो माणसमध्ये संसर्गित होणारा नाही. माणसामध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण पॅनगोलियन नावाच्या प्राण्यापासून झाल्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीला वटवाघळमुळे कोरोना होणार नाही.”

चीनमधून उद्या रॅपिड टेस्ट किट येणार आहेत. या किटच्या वापराचा सर्विलन्सही होणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे मुख्य संशोधन रमण गंगाखेडकर यांनी दिली. दरम्यान, आयसीएमआरने केलेल्या संशोधनात भारतातील दोन प्रकारच्या वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे कोरोना विषाणू सापडले आहेत. यात केरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी आणि तामिळनाडूच्या वटवाघळांचा समावेश आहे. असं असलं तरी आयसीएमआरच्या संशोधकांनी हेही स्पष्ट केलं आहे की वटवाघळांमधील कोरोना विषाणूंचा माणसात संसर्ग होत असल्याचं सांगणारा कोणताही पुरावा किंवा संशोधन अहवाल उपलब्ध नाही.

इंडियन जर्नल ऑफ रिसर्चमध्ये संबंधित संशोधन अहवाल प्रकाशित झाला आहे. यात 25 वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. या अहवालात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की वटवाघळांमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूचा महामारीला जबाबदार कोविड 19 विषाणूशी थेट काही संबंध नाही. कोविड 19 महामारीसाठी सार्स जबाबदार असल्याचंही सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या :

कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस

केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही कोरोना लढ्यासाठी पैसे मिळेनात : बाळासाहेब थोरात

राजकारणात राजकीय संघर्ष नेहमीचा, कोरोनाचा पराभव हे आपले उद्दिष्ट : शरद पवार

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, ‘जी दक्षिण’मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

ICMR on Corona Viruses in Bat and Human Infection

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.