लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज असेल तर ऑनलाईन बंद करा एफडी; 2 मिनिटांत ट्रान्सफर करा पैसे

फिक्स डिपॉझिटची रक्कम किंवा त्यावरील कर्जाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने आपण काढू शकतो. या ऑनलाईन प्रक्रियेसाठी दोन ते तीन मिनिटांचाच वेळ लागू शकतो. (If you need money in lockdown, turn off online FD; Transfer money in 2 minutes)

लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज असेल तर ऑनलाईन बंद करा एफडी; 2 मिनिटांत ट्रान्सफर करा पैसे
लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज असेल तर ऑनलाईन बंद करा एफडी; 2 मिनिटांत ट्रान्सफर करा पैसे

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नोकरी असो वा व्यवसाय, सगळीकडे पैशांची चणचण जाणवू लागली आहे. त्यामुळे लोक बँकांमध्ये मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलेली रक्कम काढताहेत. तसेच अनेक जण या फिक्स डिपॉझिटवर लोन करून आपली आर्थिक गरज भागवत आहेत. मात्र या प्रक्रियेसाठी ज्यादा वेळ जात आहे. फिक्स डिपॉझिटची रक्कम किंवा त्यावरील कर्जाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने आपण काढू शकतो. या ऑनलाईन प्रक्रियेसाठी दोन ते तीन मिनिटांचाच वेळ लागू शकतो. त्यामुळे खूप कमी वेळेत आपल्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतील. (If you need money in lockdown, turn off online FD; Transfer money in 2 minutes)

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर एका ग्राहकाच्या प्रश्नावर उत्तर देताना फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी बंद करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला टॅग करून एका ग्राहकाने यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना नेमके कोणते ग्राहक आपली एफडीतील रक्कम मिळवू शकतात, त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया कशाप्रकारे पूर्ण केली पाहिजे, याची सविस्तर माहिती दिली आहे.

ऑनलाईन पद्धतीने कोणते ग्राहक आपले एफडी अकाऊंट बंद करू शकतात?

स्टेट बँकेचे सर्वच ग्राहक ऑनलाईन पद्धतीने त्यांचे एफडी खाते बंद करू शकत नाहीत. तर ज्या ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने एफडी केली होती अर्थात ऑनलाईन माध्यमातून एफडीमध्ये पैसे गुंतवले होते, तेच ग्राहक ऑनलाईन पद्धतीने एफडीतील पैसे काढू शकणार आहेत किंवा हे खाते पूर्णत: बंद करू शकणार आहेत. इतर ग्राहकांना त्यांचे एफडी खाते बंद करण्यासाठी त्यांच्या बँकेच्या होम शाखेशीच संपर्क साधावा लागणार आहे.

खाते बंद कसे होते?

एसबीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एफडी खाते बंद करण्यासंदर्भातील प्रक्रियेची एक यूट्यूब लिंक शेअर केली आहे. त्या व्हिडीओनुसार ग्राहकांना सर्वात आधी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर लॉगिननंतर आपण होम पेजवर फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय दिसेल. तेथील ‘ई-टीडीआर/ई-एसटीडीआर(एफडी)’वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यातील ‘ई-टीडीआर/ई-एसटीडीआर (एफडी)’वर आधीपासूनच क्लिक केलेले असेल. त्यामुळे तुम्हाला आता केवळ प्रोसीड बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर येथे ‘क्लोज अकाऊंट प्रिमॅच्युअरी’ या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर जेवढे एफडी असेल, त्याची यादी तुमच्यासमोर येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या एफडीची निवड करा. यावेळी तुम्हाला पुन्हा एफडीचा तपशील दिसेल. ज्यावर रिमार्क्सच्या ऑप्शनवर एफडी बंद करण्याचे कारण लिहा. त्यनंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल, तो ओटीपीच्या ऑप्शनमध्ये लिहा. त्यानंतर तुमचे जे अकाऊंट एफडीला जोडलेले असेल, त्यात पैसे क्रेडिट केले जातील. (If you need money in lockdown, turn off online FD; Transfer money in 2 minutes)

इतर बातम्या

टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला

पेटा संघटनेवर बंदी घाला, अमूलची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी, 40 लाख शेतकरी पत्र लिहिणार, नेमका वाद काय?