सावधान! तातडीने ‘हे’ काम करा, अन्यथा 1 जुलैपासून ऑनलाईन पेमेंटमध्ये अडथळे येऊ शकतात

अजूनही तुम्ही तुमचा पर्मानंट अकाउंट नंबर (PAN) आधारशी (Aadhaar) लिंक केलेला नसेल तर आत्ताच सावध व्हा.

सावधान! तातडीने 'हे' काम करा, अन्यथा 1 जुलैपासून ऑनलाईन पेमेंटमध्ये अडथळे येऊ शकतात

मुंबई : अजूनही तुम्ही तुमचा पर्मानंट अकाउंट नंबर (PAN) आधारशी (Aadhaar) लिंक केलेला नसेल तर आत्ताच सावध व्हा. कारण जर पॅन कार्ड आधारशी संलग्न नसेल तर तुम्हाला 1 जुलैपासून बँकिंग सेवा, डेबिट (Debit) आणि क्रेडिट कार्डचा (Credit Card) उपयोग करुन, मोबाइल बँकिंग आणि यूपीआयच्या (UPI) माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करण्यात अडथळे येऊ शकतात. याशिवाय व्याज, डिव्हिडंड आणि इतर उत्पन्नावर अधिक TDS कट होऊ शकतो. ट्रेडिंग (Trading) आणि डीमॅट खातं (Demat Accounts) देखील इनऑपरेटिव्ह होऊ शकतं (Important alert do this otherwise you may face problem in banking services from 1 july).

आयकर नियमांमधील बदलानुसार 30 जून 2021 किंवा त्याआधी आधारला PAN शी संलग्न करणं बंधनकारक करण्यात आलंय. जर पॅन कार्ड आधारशी संलग्न केलं नाही तर 1 जुलै 2021 पासून इनकम टॅक्स रूल्स, 1962 नियम 114AAA(3) नुसार PAN इनऑपरेटिव/इनव्हॅलिड मानलं जाईल.

जास्तीचा TDS कट होणार

नियम 114AAA(3) नुसार, पॅन कार्ड निष्क्रिय/अमान्य झाल्यास आयकर कायद्याच्या कलम 206AA नुसार 20 टक्के दराने टीडीएस (TDS) कपात होईल. जाएगा. ज्यांना PAN कार्ड देण्यात आलंय ते आधार नंबर प्राप्त करण्यास पात्र आहेत.

आधार आणि पॅन कार्ड लिंक कसं करायचं?

पॅन कार्ड आणि आधार लिंक करणं अगदी सोपं आहे. तुम्ही 567678 किंवा 56161 वर SMS पाठवून मेसेजिंग मार्फत हे काम पूर्ण करु शकता. आधार-पॅन लिंक करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये कॅपिटल लेटरमध्ये IDPN टाईप करुन 567678 किंवा 56161 नंबरवर पाठवा.

तुमचं आधार आणि पॅन संलग्न आहे का कसं तपासणार?

तुम्ही SMS च्या माध्यमातून तुमचं पॅन आणि आधार लिंक आहे की नाही हे तपासू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन 12 अंकी आधार नंबर टाका नंतर स्पेस देऊन 10 अंकी पॅन नंबर टाईप करा. हा SMS 567678 किंवा 56161 वर पाठवा. या मेसेजला एक रिप्लाय मेसेज येईल. त्यात तुमचं आधार आणि पॅन संलग्न आहे की नाही हे समजेल.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI