हॉटेलात जेवायला गेला अन् चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर वाद झाल्यामुळे चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मिरजमध्ये घडली. (miraj hotel murder knife)

हॉटेलात जेवायला गेला अन् चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

सांगली : मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर वाद झाल्यामुळे चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मिरजमध्ये घडली. सोमवारी (11 जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. 42 वर्षीय मृताचे नाव मुन्ना शेख उर्फ मांगलेकर असून तो मित्रांसोबत मिरजेतील मराठे मिल रोडवरील सॅन शाईन हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. हत्येचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (in Miraj 42 year old man murdered in hotel)

मिळालेल्या माहितुसार, मुन्ना शेख उर्फ मांगलेकर (42) हा सोमवारी रात्री मिरजमधील मराठे मिल रोडवरील सॅन शाईन हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्रसुद्धा होते. जेवत असताना मुन्ना शेखचे अज्ञातासोबत वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. त्यानंतर रागाच्या भरात या अज्ञाताने मुन्ना शेवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुन्ना शेख उर्फ मांगेलवार गंभीर जखमी झाला.

ही घटना घडताच हॉटेलमध्ये खळबळ उडाली. हॉटेलचे कर्मचारी आणि इतरांनी जखमी मुन्ना शेखकडे धाव घेत त्याला उपचारासाठी मिरजेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. चाकूने भोसकल्यामुळे मुन्ना गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे मिरजमधील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर मीरजमध्ये तणावाचं वातावरण आहे. हॉटेलमधील खूनचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. तर दुसरीकडे या गुन्ह्यातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नागपुरात 9 जानेवारीला 3 हत्या

नागपुरात 9 जानेवाराली एकाच दिवशी  3 हत्येच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे नागपुरात खळबळ उडाली होती. हत्येची पहिली घटना कळमना अंतर्गत डिप्टी सिग्नल वस्तीत घडली. डिजेच्या जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाची चाकूरे वार करुन ही हत्या करण्यात आली होती. दुसरी घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. छऱ्याच्या बंदुकीतून सुटलेला छरा डोळ्याला लागल्यानं लोकेश गजभिये यांचा मृत्यू झाला होता. तर तिसरी घटना कामाठी इथल्या बस स्टॅन्ड चौकात घडली होती. येथे कुंदन वंजारी या इसमाची हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना

क्षुल्लक भांडणात कुटुंबातच रंगला खुनी खेळ, एकाची हत्या, पोलिसांमुळे थोडक्यात बचावली महिला

धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले बलात्कार

(in Miraj 42 year old man murdered in hotel)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI