हनीमूनच्या रात्री नवरदेव थयथय नाचला, म्हणाला, माझं लग्न…घरच्यांनाही बसला धक्का; काय घडलं?
प्रत्येक तरुणाला आपला विवाह योग्य वयात व्हावं आणि घरात सुंदर पत्नी असावी अशी इच्छा असते. एका तरुणाने देखील हे स्वप्नं पाहीलं आणि थाटामाटात त्याच लग्नं झालं. मोठ्या थाटामाटात थोरामोठ्यांच्या आशीवार्दात लग्नाचे सर्व विधी यथासांग पार पाडले आणि मधूचंद्राची रात्र जवळ आली....

एका तरुणाने मोठ्या गाजावाजा करीत वधूचा गृहप्रवेश केला खरा, परंतू त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याची सुहागरात सुरु होताच संपली. आपल्या फसगत झाली असल्याचे त्याला कळाल्याने त्याने जोरजोराने गोंधळ घालायला सुरुवात केली. वराचा हा गोंधळ ऐकून घरातील सर्व पाहुणे मंडळी देखील आपआपल्या खोलीतून बाहेर पळत आली. अखेर वधूच्या नातेवाईकांना परगावातून बोलावण्यात आले. दोन्ही पक्षांची बैठक झाली ती हाणामारीवर आली. कोणीच माघार घ्यायला तयार नाही. दोघांनी एकमेकांचा उध्दार करीत शिवीगाळ करीत आरोप केले. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात….
वर आणि वधू यांंच्यासाठी मधूचंद्राची तयारी करण्यात आली. त्यानंतर जेव्हा मधूचंद्राची रात्र साजरी करण्याची वेळ आली तेव्हा वराने या वधूचा डोक्यावर ओढलेला पदर दूर केला तर त्याला धक्काच बसला. हा वर पळतच बेडरुममधून बाहेर पडला…जोर जोराने ओरडू लागला… अरे हाय रे कर्मा मला फसविले.. हा भलताच प्रकार आहे असे या तरुणाने सांगत नशीबाला दोष दिला. नंतर वधू आणि वराकडील मंडळीची बैठक झाली. त्यानंतर वधू पक्षाने तर वरावरच आरोप करीत तोच नपुंसक असल्याचा आरोप केला. पोलिसांनी वधू आणि वराची मेडीकल केली आणि पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हे प्रकरण अखेर पोलिसांच्या दफ्तरी पोहचले. वराने वधूवर ती महिलाच नसून तृतीय पंथी असल्याचा आरोप केला. तर वधू आणि वधूकडील मंडळींना वराला नपुंसक असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात आरोप केल्यानंतर अखेर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला. पती आणि पत्नी दोघांची मेडीकल करण्यात आली आहे. आता अहवाल आल्यानंतरच कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे समजेल असे म्हटले जात आहे.
11 जुलै रोजी लग्न झाले
गंगानगर परिसरातील एका गावात राहणार्या एका तरुणाचा विवाह 11 जुलै रोजी गौतमबुद्धनगरातील तरुणीशी झाला. वराने आरोप केला आहे की वधू किन्नर म्हणजे हिजडा, तृतीयपंथीय आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होती.वरपक्षाने वधू पक्षाला फोन करून हा घडलेला प्रकार सांगितला. शनिवारी सकाळी वधू पक्षाकडील मंडळी आली.त्यांनी वराचा हा आरोप मान्य करण्यास साफ नकार दिला. मुलीकडेची मंडळी म्हणाली मुलगी तर किन्नर नाहीच पण मुलगाच नपुंसक आहे. त्यानंतर दोन्ही मंडळीत मोठी चकमक उडाली.
पोलिसांच्या डोक्याला ताप
दोन्ही गट आपआपल्या दाव्यावर ठाम राहील्याने अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिस ठाण्यात दोन्ही मंडळींनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर वधू आणि वर या दोघांची लैंगिक तपासणी करण्यात आली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. वधू आणि वर आपआपल्या दाव्यांवर ठाम आहेत. दोन्ही पक्षाचा आरोप आहे की आपल्याला फसविले आहे. प्रकरणाचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे.
