नागपूर खुनांच्या घटनांनी हादरलं, नरखेड आणि उमरेड तालुक्यात दोघांची हत्या

नागपूर जिल्हा खुनाच्या घटनांनी हादरलाय. नरखेड आणि उमरेड तालुक्यात दोघांची हत्या करण्यात आली. नरखेड तालुक्यात बेलोना मार्गावर परसोडी शिवारात एक हत्या झाली. शहजाद अबुल लईक शेख (30) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही हत्या पैशांच्या वादातून झाल्याचा अंदाज आहे.

नागपूर खुनांच्या घटनांनी हादरलं, नरखेड आणि उमरेड तालुक्यात दोघांची हत्या
गॅरेजमधील युवकाच्या अश्लील वर्तनाला कंटाळून मित्राकडून हत्या


नागपूर : नागपूर जिल्हा खुनाच्या घटनांनी हादरलाय. नरखेड आणि उमरेड तालुक्यात दोघांची हत्या करण्यात आली. नरखेड तालुक्यात बेलोना मार्गावर परसोडी शिवारात एक हत्या झाली. शहजाद अबुल लईक शेख (30) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही हत्या पैशांच्या वादातून झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

दुसरी हत्या उमरेड तालुक्यातील बायपास मार्गावर घडली. या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव प्रवीण कठाने असं आहे. ही हत्या देखील पैशांच्या वादातूनच झाल्याची माहिती आहे. आशिष गजभिये असं आरोपीचं नाव आहे. त्याने मृत्यू झालेली व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय.

दोन दिवसांपूर्वीचं भाडणं काढलं, दोघांवर सशस्त्र हल्ला, 5 आरोपींना बेड्या, नागपुरात गुन्हेगारी वाढली ?

नागपुरातील गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. 11 ऑगस्ट अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वकर्मा नगर येथे सशस्त्र हल्ल्याची घटना घडली. पाच आरोपींनी दोघांवर शस्त्रांनी हल्ला केला. यात दोघेही गंभीर झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी आणि जखमींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद  

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी घटना घडली. या परिसरात पाच जणांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे आरोपी आणि जखमी यांच्यात जुनी ओळखी आहे. दोन दिवसांपूर्वी काही कारणांमुळे आरोपी आणि जखमींमध्ये वाद झाला होता. आज दुपारी हा वाद पुन्हा चिघळला. त्यानंतर यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यामुळे एका गटातील पाच जणांनी दुसऱ्या गटातील दोघांवर सशस्त्र हल्ला केला.

शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढल्याचा आरोप

हा हल्ला भीषण असल्यामळे यात दोघे जंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांनी कारवाई केली असली तरी अशा प्रकारचे गुन्हे रोजच घडत आहेत. दररोज घडणाऱ्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा :

दोन दिवसांपूर्वीचं भाडणं काढलं, दोघांवर सशस्त्र हल्ला, 5 आरोपींना बेड्या, नागपुरात गुन्हेगारी वाढली ?

सोशल मीडियावर ओळख, विधवा महिलेशी मंदिरात लग्न, शारीरिक संबंध ठेवत दोन लाखांना फसवणूक

एकमेकांकडे पाहून खुन्नस दिल्याचा राग, नागपुरातील गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

व्हिडीओ पाहा :

Increasing murder case in Nagpur now murder in Narkhed and Umred

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI