पाकिस्तानला प्रत्युत्तर, लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकच्या 10 सैनिकांचा खात्मा : लष्करप्रमुख

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली. या दरम्यान चार दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये दहशतवाद्यांसह 6 ते 10 पाकिस्तानी सैनिकांचाही खात्मा करण्यात आला (Pakistani soldier death) , असा दावा भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केला.

पाकिस्तानला प्रत्युत्तर, लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकच्या 10 सैनिकांचा खात्मा : लष्करप्रमुख
सचिन पाटील

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 20, 2019 | 8:09 PM

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाचं आज (20 ऑक्टोबर) भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं (Pakistan violates ceasefire). भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली. या दरम्यान चार दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये दहशतवाद्यांसह 6 ते 10 पाकिस्तानी सैनिकांचाही खात्मा करण्यात आला (Pakistani soldier death) , असा दावा भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केला.

पाकिस्तानच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन (Pakistan violates ceasefire) केल्यानंतर आज (20 ऑक्टोबर) भारतीय सैन्याकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ तसेच अनेक दहशताद्यांचाही खात्मा करण्यात आला. पीओकेतील अथमुकम, जूरा, कुंदलशाही येथील दहशतवाद्यांचे तळ आम्ही उद्धवस्त केले आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच 6 ते 10 पाकिस्तानी सैनिकही मारले गेले (Pakistani 6 to 10 soldier died) आहेत, असं रावत यांनी सांगितलं.

पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे शिबीर असून हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील शातंता त्यांना बघवत नाही. हे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात गोंधळ घालण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या काश्मीरमधील सर्व प्रतिबंध हटवण्यात आले असून लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत, तर लहान मुलंही शाळेत जायला घाबरत आहेत, असंही बिपीन रावत यांनी सांगितलं.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्याने आक्रमकपणे उत्तर दिलं. दहशतवाद्यांच्या तळांवर निशाणा साधत सैन्याने आर्टिलरी गनचा वापर केला. तसेच, पाकिस्तानमधील घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे चार लाँच पॅड उद्धवस्त केले. सतत पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याला आज भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांकडून आज (20 ऑक्टोबर) सकाळी भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला. यामध्ये एक नागरिक आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाला. तसेच, तीन नागरिक जखमी झाले आहेत, असं स्थानिक पोलिसांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें