कोरोनाचं संकट, मग कोकणात इतके लोक का पाठवताय? थेट इंडियन मेडिकल असो.चा आक्षेप

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात सोडण्याच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशननेच आक्षेप घेतला आहे (Indian Medical Association object entry in Kokan).

कोरोनाचं संकट, मग कोकणात इतके लोक का पाठवताय? थेट इंडियन मेडिकल असो.चा आक्षेप
Follow us
| Updated on: Aug 08, 2020 | 11:38 AM

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून लाखोंच्या संख्येने चाकरमान्यांना कोकणात सोडण्यात येत आहे. यावर आता थेट इंडियन मेडिकल असोसिएशननेच आक्षेप घेतला आहे (Indian Medical Association object entry in Kokan). कोरोना संसर्गाचा धोका असताना चाकरमान्यांना अशा पद्धतीने कोकणात पाठवणं चुकीचं असल्याची भूमिका मेडिकल असोसिएशनने घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोविडचे संकट असताना कोकणात मोठ्या संख्येने चाकरमान्यांना पाठवणं अयोग्य असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. या संदर्भातील मेडिकल असोसिएशनने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आक्षेप घेतला आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात पाठवण्याचा निर्णय चुकीचा आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलंय.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या निर्णयाने कोकणातील आरोग्य व्यवस्था कोलमडेल. तसेच 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी देखील चुकीचा आहे, असंही मेडिकल असोसिएशनच्या या पत्रात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. डॉक्टरांची कमतरता आहे. 3-4 लाख नागरिकांना येऊ दिलं, तर रत्नागिरी जिल्ह्यावर मोठं संकट कोसळू शकतं. आयएमडी संघटनेचे कोविड समन्वयक निनाद नाफडेंनी पत्र पाठून सरकारला याबाबत वेळीच पावलं उचलण्याची कळकळीची विनंती केलीय.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो चाकरमाने एसटी बसमधून कोकणात दाखल होवू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच 21 एसटी गाड्या दाखल झाल्यात. गुहागरमध्ये सर्वाधिक गाड्यांमधून चाकरमानी दाखल झालेत. गुहागर तालुक्यात 9 एसटी बसमधून चाकरमानी आले आहेत. या खालोखाल चिपळूणमध्ये 8, दापोलीत 4, रत्नागिरी तालुक्यात 3 बसेस दाखल झाल्या. आज आणखी 21 बस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे चाकरमानी आता कोकणात गणेशोत्सवासाठी लालपरीने दाखल होवू लागलेत.

हेही वाचा :

औरंगाबादेत कोरोनाग्रस्त 90 वर्षीय आजीला जंगलात सोडलं, निर्दयी नातेवाईक पसार, गुन्हा दाखल

पुण्यात श्रींची प्रतिष्ठापना कोठे करायची? मंदिरंही बंद असल्याने गणेश मंडळांमध्ये संभ्रम

डॉ. आरती ठिक होतील, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुबियांना शरद पवारांचा फोन

Indian Medical Association object entry in Kokan

Non Stop LIVE Update
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.