AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sydney Test, Day 3: कांगारुंच्या तोफखान्यासमोर टीम इंडियाची शरणागती, ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी

सिडनी कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिंस या ऑस्ट्रेलियन तोफखान्याचा सामना करु शकले नाहीत.

Sydney Test, Day 3: कांगारुंच्या तोफखान्यासमोर टीम इंडियाची शरणागती, ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी
| Updated on: Jan 09, 2021 | 10:06 AM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Team India vs Australia 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंटवर खेळवला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सध्या सुरु आहे. भारताने पहिल्या डावात 244 धावा जमवल्या असून ऑस्ट्रेलियाला 94 धावांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचे चेतेश्वर पुजारा (9) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (5) नाबाद होते. दुसऱ्या दिवसअखेरपर्यंतच्या 2 बाद 96 वरुन भारताने आज सकाळी सुरुवात केली. काल सावध सुरुवात करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आज आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु पॅट कमिंसच्या गोलंदाजीसमोर त्याचा टिकाव लागला नाही. सकाळच्या सत्रात भारताने झटपट दोन विकेट गमावल्या. टीम इंडियाने आधी रहाणे (22) आणि मग हनुमा विहारी (04) यांच्या विकेट गमावल्या. त्यानंतर लंच ब्रेकपर्यंत भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने जेवणाची सुट्टी (लंच ब्रेक) होईपर्यंत भारताचा डाव सावरला. दोघांनीही खेळपट्टीवर चांगलाच जम बसवला होता. परंतु लंचनंतर भारताचा डाव गडगडला. (INDvsAUS: India trail by 94 runs in Sydney test)

लंच ब्रेकपर्यंत भारताने 4 फलंदाजांच्या बदल्यात 180 धावा फलकावर लावल्या होत्या. पंत-पुजाराच्या जोडीने खेळपट्टीवर जम बसवला होता. परंतु लंचनंतर भारताचा डाव गडगडला. लंचनंतर एक षटक झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या हातात नवा चेंडू सोपवण्यात आला. त्यामुळे कर्णधार टीम पेनने पुन्हा एकदा जलदगती गोलंदाजांना गोलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय फलंदाज मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिंस या ऑस्ट्रेलियन तोफखान्याचा सामना करु शकले नाहीत. टप्प्या टप्प्याने भारतीय फलंदाज बाद होत गेले. सर्वात आधी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 35 धावांवर बाद झाला जोश हेडलवूडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये डेव्हिड वॉर्नरने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

पंत बाद होण्यापूर्वी पंत-पुजारा जोडीने 50 धावांची भागिदारी केली होती. भारतीय संघ बॅकफुटवर असताना या भागिदारीने भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु पंत बाद होताच चेतेश्वर पुजारादेखील माघारी परतला. तत्पूर्वी पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. पुजाराने 174 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. 50 धावा पूर्ण केल्यानंतर पुजारा पॅट कमिंससमोर टिकू शकला नाही. कमिंसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टीम पेनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. या मालिकेत चौथ्यांदा पुजाराला कमिंसने बाद केले.

195 धावसंख्या असताना भारताने एका मागोमाग दोन विकेट गमावल्या त्यामुळे भारतीय संघाची अवस्था 6 बाद 195 अशी झाली. त्यानंतर कोणताही फलंदाज भारतीय डाव सावरू शकला नाही. शेवटचे फलंदाज टप्प्या टप्प्याने हजेरी लावून माघारी परतले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने काही काळ कांगारुंचा प्रतिकार केला. परंतु त्याला कोणाची साथ मिळाली नाही.

पंत-पुजारा बाद झाल्यानंतर रवीचंद्रन अश्विन फलंदाजीसाठी मैदानात आला. आक्रमक सुरुवात करणारा अश्विन संघाच्या 205 धावा फलकावर लागलेल्या असताना बाद झाला. त्याने दोन चौकारांसह 10 धावा जमवल्या. पॅट कमिंसने त्याला धावाबाद केले. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा नवदीप सैनी (3) बाद झाला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेडने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर जसप्रीत बुमराह (0) हजेरी लावून गेला. मोहम्मद सिराज 6 धावांवर असताना भारताच्या दहाव्या फलंदाजाच्या रुपात बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव 244 धावांवर आटोपला. अष्टपैलू रवींद्र जडेजाने काही काळ कांगारुंचा प्रतिकार करत जलद गतीने धावा जमवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. जडेजाने 37 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 28 धावा केल्या.

दरम्यान, काल (शुक्रवार) टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी आली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शुभमन आणि रोहित दोघेही सेट झाले. मात्र रोहितला हेझलवूडने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. रोहितने 77 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावा केल्या.

रोहितनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पुजारासह गिलने स्कोअरबोर्ड हलता ठेवला. या दरम्यान गिलने शानदार अर्धशतक झळकावलं. मात्र अर्धशतकी खेळीनंतर गिल आऊट झाला. गिलने 101 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा केल्या. गिलनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही ओव्हर शिल्लक होत्या. यामुळे रहाणे-पुजारा या जोडीने संथ खेळ केला. या पुजारा आणि रहाने या दोघांनी दिवसखेर नाबाद प्रत्येकी 9 आणि 5 धावा केल्या होत्या. परंतु आज सकाळच्या सत्रात भारताने रहाणे आणि त्यापाठोपाठ हनुमा विहारीची विकेट गमावली.

संबंधित बातम्या : 

Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट

प्राण जाये पर वचन न जाये ! मराठमोळ्या क्रिकेटवेड्याने शब्द पाळला, पैज हरल्याने अर्धी मिशी काढली!

Ind vs Aus : कांगारुंना हरवायचं तर किती रन्स पाहिजे?, अजय जडेजाने सांगितला एक्झॅट आकडा!

(INDvsAUS: India trail by 94 runs in Sydney test, Puajara-Jadeja tried to save Match)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.