Corona : जळगावात कोरोनाचा तिसरा रुग्ण; 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात दाखल असलेल्या एका 60 वर्षीय महिलेची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Corona : जळगावात कोरोनाचा तिसरा रुग्ण; 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण (Jalgaon Corona Patient) आढळला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात दाखल असलेल्या एका 60 वर्षीय महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल काल रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ही 3 झाली आहे. तर एकाचा (Jalgaon Corona Patient) मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाचा जिल्ह्यात पुन्हा एकदा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

अंमळनेर येथील एका 60 वर्षीय महिलेला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने तिला 17 एप्रिलला जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले होते. तिच्या घशाचे स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल काल रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे.

या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. तिची ट्रॅव्हल्स हिस्ट्री काय आहे, याची माहिती काढली जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच महिलेला कोरोनाची लागण कशी झाली, याचे उत्तर मिळणार आहे, असे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी जळगाव शहरातील एका 49 वर्षीय प्रौढासह 63 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. 49 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोरोना चाचणीचे 2 अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर 63 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाचे किती रुग्ण?

महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल (18 एप्रिल) दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 648 वर पोहोचली आहे. यातील 184 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यात 78 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

Jalgaon Corona Patient

संबंधित बातम्या :

Corona Update : यवतमाळला मोठा दिलासा, कोरोनाबाधित 10 पैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबईत एका दिवसात 184 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

धारावीत कोरोना रुग्णांची शंभरी पार, माटुंगा लेबर कॅम्पमधील चौघांना लागण

देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित

Published On - 8:44 am, Sun, 19 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI