जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, अवघ्या 20 व्या वर्षी गमावले प्राण

आज जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात दोन जवानांना वीरमरण आलं.

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, अवघ्या 20 व्या वर्षी गमावले प्राण
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 10:25 PM

जळगाव : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (terrorist attack) आणखी एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथला एक जवान शहीद (Young martyr) झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात दोन जवानांना वीरमरण आलं. एक जवान चाळीसगाव तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. (jalgaon jawan has been killed in a terrorist attack in Jammu and Kashmir)

अधिक माहितीनुसार, यश दिगंबर देशमुख असं शहीद जवानाचं नाव आहे. यश हे अवघ्या 20 वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आपला लेक देशासाठी शहीद झाला आहे हे अद्याप त्यांच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत यश दिगंबर देशमुख शहीद झाल्याची महिती त्यांना मिळाली असून यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी कधी आलं जाईल याबाबत अजून कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (jalgaon jawan has been killed in a terrorist attack in Jammu and Kashmir)

दरम्यान, यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवानांच्या पार्थिवाच्या दर्शनाची आता सगळ्यांना ओढ लागली आहे. यश यांच्या बातमीमुळे पीपळगाव शोकसागरात बुडालं आहे. एकही चूल गावात पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

इतर बातम्या –

26/11 Mumbai Attack | ‘जनतेसाठी बलिदान देणाऱ्यांचे आम्ही ऋणी’, बॉलिवूडकरांकडून शहीदांना श्रद्धांजली

कळसुबाई शिखरावर तिरंगी झेंड्याद्वारे साकारला महाराष्ट्राचा नकाशा, शहीद जवानांना अनोखी आदरांजली

(jalgaon jawan has been killed in a terrorist attack in Jammu and Kashmir)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.