‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी सापडला

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या राहत्या घरात अभिनेता समीर शर्मा याने पंख्याला लटकून गळफास घेतला

'कहानी घर घर की' फेम अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी सापडला
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 1:33 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या आत्महत्या प्रकरणातून चाहते सावरले नसतानाच आणखी एका टीव्ही अभिनेत्याने आयुष्य संपवले. ‘क्योंकि सास भी कभी बहू’, ‘कहानी घर घर की’ सारख्या मालिकांतून प्रसिद्ध झालेला अभिनेता समीर शर्माचा मृतदेह राहत्या घरी सापडला. समीरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. (Actor Sameer Sharma found dead at Mumbai Home)

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या राहत्या घरात समीरने पंख्याला लटकून गळफास घेतला. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याची शंका आहे.

चिंचोली बंदर भागात नेहा बिल्डिंगमध्ये अभिनेता समीर शर्मा राहत होता. समीर फेब्रुवारी महिन्यापासून इथे भाड्याने घर घेऊन एकटा राहत होता. समीरने फोन न उचलल्यामुळे त्याच्या पत्नीने मित्रांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने तपासले असता समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

हेही वाचा : नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

समीरच्या मृतदेहाची अवस्था वाईट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्याच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मालाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

समीरने ‘ये रिश्तें हैं प्यार के’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर-घर की’, ‘वो रेहने वाली महलो की’ या सारख्या 14 मालिकांमध्ये काम केले आहे. ‘हसी तो फसी’ या सिनेमातही तो झळकला होता.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

समीर शर्मा मूळ दिल्लीचा असून शिक्षण संपल्यानंतर तो बंगळुरुला गेला होता. तिथे त्याने जाहिरात एजन्सी, आयटी कंपनी आणि बंगलोरमधील रेडिओ सिटीसाठी काम केले. नंतर अभिनयात करिअर करण्यासाठी तो मुंबईत शिफ्ट झाला. ‘स्टार वन’च्या ‘दिल क्या चाहता है’ मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर, ‘कहानी घर घर की’ मालिकेत त्याला ऑफर मिळाली. (Actor Sameer Sharma found dead at Mumbai Home)

Non Stop LIVE Update
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.