…तर काही दिवसातच हिमाचल कचऱ्याचे आगार बनेल; कंगनाचं पर्यटकांना कचरा न फेकण्याचं आवाहन

आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा नव्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.

...तर काही दिवसातच हिमाचल कचऱ्याचे आगार बनेल; कंगनाचं पर्यटकांना कचरा न फेकण्याचं आवाहन
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 2:12 PM

शिमला: आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा नव्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. तुम्ही जर हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी आला तर इकडे तिकडे प्लास्टिक फेकू नका. नाही तर काही दिवसातच हिमाचलवर कचऱ्याचा ढिग निर्माण होईल आणि हिमालय कचऱ्याचे आगार बनेल, अशी भीती व्यक्त करत कंगनाने पर्यटकांना हिमालय परिसरात कचरा न फेकण्याचं आवाहन केलं आहे. (kangana Ranaut tweeted about plastic garbage and pollution)

हिमाचल प्रदेशात तुम्ही पर्यटनासाठी नक्की. या पण आल्यानंतर येथे प्लास्टिक फेकू नका. विशेषता प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्सचे पाकिटे फेकू नका, असं आवाहन कंगनाने ट्विटद्वारे केलं आहे. हिमाचल प्रदेशामधील निसर्ग हा अतिशय सुंदर आहे. मात्र, अशाच प्रकारे जर येथे प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्सचे पाकिटे फेकत राहिला तर नक्कीच हिमाचल प्रदेशामधील सुंदर खोरं एक दिवस कचऱ्याचे आगार बनेल, अशी धोक्याची जाणीवही तिने करून दिली आहे.

हिमाचल फिल्म शूटींगसाठी लोकप्रिय ठिकाण बनले आहे. बॉलिवूडमध्ये सुरुवातीला जेव्हा मी लोकांना हिमाचलची रहिवाशी आहे म्हणून सांगायचे तेव्हा लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि दुर्गम गावातून आल्यामुळे ते मला जज करायचे. पण आता येथे व्यावसायिकदृष्ट्या चांगला विकास झाला आहे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही याचा फायदा होत आहे, असंही तिने नमूद केलं आहे. कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) मुंबई पोलीस चौकशी बोलावणार आहेत (Mumbai Police Notice). येत्या सोमवारी (26 ऑक्टोबर) तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी क्रमश: चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे (Mumbai Police Notice).

17 ऑक्टोबरला कंगनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले.

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | पोलिसांच्या समन्सनंतर कंगना रनौतची ‘टीवटीव’, पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका!

Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

(kangana Ranaut tweeted about plastic garbage and pollution)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.