Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचं मूक समर्थन?

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. या आंदोलनाला देशासह विदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी पंजाबी चित्रपटसृष्टीतील कलावंत, पंजाबी क्रिकेटर पुढे येत आहेत.

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचं मूक समर्थन?

मुंबई : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Delhi Farmers Protest) आज 15 वा दिवस आहे. तर गेल्या महिन्याभरापासून पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशासह विदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी पंजाबी चित्रपटसृष्टीतील कलावंत, पंजाबी क्रिकेटर पुढे येत आहेत. शेतकऱ्यांचे समर्थन करताना केंद्र सरकारला जाब विचारण्याची हिंमतदेखील पंजाबी कलावंत दाखवत आहेत. बॉलिवूड कलाकार मात्र नेहमीप्रमाणे अशा विषयांवर बोलणं आणि व्यक्त होणं टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने शेतात काम करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सल्लूभाईच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहेच, सोबतच अनेक चाहते या फोटोचा थेट शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडत आहेत. सलमान खान शेतकरी आंदोलनाचं मूक समर्थन करत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. (Is Salman Khan supports Farmers protest? Salman’s photo while farming goes viral)

सलमानने हा फोटो शेअर करत ‘मदर अर्थ’ (Mother Earth) असं कॅप्शन दिलं आहे. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, पंजाबच्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सलमानने हा फोटो शेअर केला असावा. सलमान कदाचित शेतकरी आंदोलनाचं मूक समर्थन करत असेल, अशा कमेंट्सही यावर येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

शेतकरी आंदोलनावरुन कंगना रानौत आणि दिलजित दोसांझमध्ये ट्विटर वॉर

दरम्यान, गेल्या आठवड्यात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यात जोरदार ट्विटर वॉर पाहायला मिळाले. कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे पातळी सोडून दिलजित दोसांझ याच्यावर टीका केली. मात्र, दिलजित दोसांझ यानेही कंगनाला तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले.

कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती. त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली.

कंगनाच्या या ट्विटला दिलजित दोसांझ यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगले जमते, असे दिलजितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी ट्विट करून दिलजित दोसांझला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेत्री स्वरा भास्कर याचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Salman Khan | डोक्यावर पगडी, किलर अंदाज, पाहा भाईजानचा ‘अंतिम’ फर्स्ट लूक

आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा; केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

शेतकरी आंदोलनाचा 15वा दिवस, प्रस्ताव फेटाळ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार

(Kisan Andolan : Is Salman Khan supports Farmers protest? Salman’s photo while farming goes viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI