मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्यांच्या कानफटात बसली, किशोरी पेडणेकरांची टीका

ज्या लोकांनी CBIची मागणी करून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला त्यांच्या कानफटात बसली असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्यांच्या कानफटात बसली, किशोरी पेडणेकरांची टीका

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर त्याने हत्या केली असल्याचा आरोप होत होता. पण यावर एम्सचा (AIIMS) रिपोर्ट आल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आज आलेल्या एम्सच्या रिपोर्टवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली. ज्या लोकांनी CBIची मागणी करून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला त्यांच्या कानफटात बसली, अशा शब्दात किशोरी पेडणेकर विरोधकांना झापलं आहे. (kishori pednekar criticized on who politics in sushant singh rajput case)

सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा अहवाल एम्सनं दिला आहे. याआधीही विष प्रयोग झालाच नसल्याचं एम्सनं म्हटलं होतं. पण तरीदेखील CBI चौकशीची मागणी करून मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात आला होता. पण एम्सनं दिलेल्या अहवालामुळे आरोप करणाऱ्यांच्या कानफटात बसली अशी टीका महापौरांनी केली आहे.

सुशांतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीही एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.

सुशांतसिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले. (kishori pednekar criticized on who politics in sushant singh rajput case)

सुशांत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावर देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला.

एम्सच्या (AIIMS) या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार त्याच्यावर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या –

Sushant Singh Rajput | सुशांतसिंह राजपूतची हत्या नव्हे, आत्महत्या : AIIMS

PHOTO : कधी झाला सुशांतचा मृत्यू आणि केव्हा केलं पोस्टमार्टम? रिपोर्टमधून सत्य समोर

(kishori pednekar sushant singh rajput case mumbai police)

Published On - 5:53 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI