माहेरुन सासरी जाताना कालव्यात घसरुन पडली, कोल्हापुरात नवविवाहितेचा मृत्यू

नैवेद्य दाखवण्यासाठी कालव्यात उतरल्या असताना पल्लवी पाटील यांचा बुडून मृत्यू झाला.

माहेरुन सासरी जाताना कालव्यात घसरुन पडली, कोल्हापुरात नवविवाहितेचा मृत्यू

कोल्हापूर : माहेरुन सासरी जाताना कालव्यात पाय घसरुन पडल्याने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नैवेद्य दाखवताना निष्काळजी झाल्याने तरुणीला प्राण गमवावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Newly Married Lady dies after drowning in Canal)

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या कसबा सांगाव भागात राहणाऱ्या नवविवाहितेचा मृत्यू झाला. पल्लवी पाटील असं मृत विवाहितेचं नाव आहे.

पल्लवी वाडदे वसाहत इथल्या माहेरी गेल्या होत्या. आपले पती संतोष पाटील यांच्यासोबत त्या माहेरुन सासरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. वाटेत दूधगंगा डाव्या कालव्यामध्ये भाताचा नैवेद्य दाखवण्यासाठी पाटील दाम्पत्य थांबले.

नैवेद्य दाखवण्यासाठी उतरल्या असताना पल्लवी पाटील यांचा पाय घसरला आणि त्या कालव्यात पडल्या. पती संतोष यांनी पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी आरडाओरड केली, मात्र ती निष्फळ ठरली. कालव्यात बुडून पल्लवी यांचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी पल्लवी यांचा मृतदेह बाहेर काढला.

संबंधित बातम्या :

बेपत्ता झाल्याचा बनाव, नवी मुंबईचा विवाहित तरुण गर्लफ्रेंडसोबत इंदूरला सापडला

(Kolhapur Newly Married Lady dies after drowning in Canal)

Published On - 3:28 pm, Thu, 17 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI