AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरकरांची नेटकी तयारी, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी

कोरोनाला रोखण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं (Shivaji University converted into corona hospital) रुपांतर रुग्णालयात करण्यात येणार आहे.

कोल्हापूरकरांची नेटकी तयारी, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी
| Updated on: Apr 01, 2020 | 12:46 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाविरोधी लढ्यासाठी नेटाने तयारी केल्याचं दिसतंय. कोरोनाला रोखण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं (Shivaji University corona hospital) रुपांतर रुग्णालयात करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. इथे तब्बल 1 हजार बेडचे विशेष आयसोलेशन रुग्णालय तयार करता येऊ शकतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या वसतिगृहात हे तात्पुरते रुग्णालय उभे करण्यासाठी विद्यापीठ परिसराची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली. (Shivaji University corona hospital) असं असलं तरी विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालिन उपाययोनेची तयारी केली. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील मुले आणि मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी 1476 बेड क्षमतेच्या रुग्णालयाची व्यवस्था होऊ शकते, असं निदर्शनास आलं. त्यामुळे इथेच हजार बेडचं रुग्णालयात तयार करण्याची चाचपणी होत आहे.

रुग्णालय कसं होऊ शकतं?

  • शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस शेकडो एकर परिसरात पसरला आहे.
  • या कॅम्पसमध्ये मुलांचे आणि मुलींची भव्य वसितगृहे आहेत.
  • या वसतिगृहातील प्रत्येक खोल्यांमध्ये किमान दोन बेड आहेत. त्यामुळे त्याचं रुग्णालयात रुपांतर करणं शक्य आहे.
  • जवळपास एक हजार रुग्णांची व्यवस्थित सोय इथे होऊ शकते.

विद्यार्थ्यांची सोय कुठे? दरम्यान, सध्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येईल. विद्यार्थ्यांचं जे काही साहित्य असेल, ते साहित्य स्वत: विद्यापीठ प्रशासन स्थलांतरित करुन देईल.

कोल्हापुरात तीन रुग्ण

कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पेठ वडगावमधील एक आणि कोल्हापूर शहरातील दोघांचा समावेश आहे. पेठ वडगावमधील महिलेवर सांगलीतील मिरज इथे उपचार सुरू आहेत तर बाकी दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोल्हापुरात तिसरा रुग्ण 29 मार्चला रात्री आढळला. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बहिणीलाही कोरोना झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झालं. पुण्याहून कोल्हापूरला नातेवाईकाकडे आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या बहिणीला संसर्ग झाल्याने, कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली.

महाराष्ट्रातील आकडा वाढताच

महाराष्ट्रातील ‘कोरोनाग्रस्तांचा’ आकडा वाढतानाच दिसत आहे. 18 रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. मुंबईत 16, तर पुण्यात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. (Corona Patients Updates in Maharashtra)

संबंधित बातम्या 

Corona | मुंबईत 16 नवे कोरोनाग्रस्त, पुण्यातही बेरीज सुरुच, महाराष्ट्रातील आकडा 320 वर

धाकधूक वाढली, कोल्हापुरात कोरोना कक्षातील वृद्धाचा मृत्यू, रिपोर्ट येण्यापूर्वी मृत्यूने गाठलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.