अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप

गोस्वामी यांच्यासोबत अटकेत असलेले फिरोज शेख हे गेल्या तीन दिवसांपासून एकाच कपड्यावर आहेत. पोलिसांकूडन सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे, असा आरोप फिरोज शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी केला.

अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच गोस्वामी यांच्यासोबत अटकेत असलेले फिरोज शेख हे गेल्या तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर आहेत. पोलिसांकूडन सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे, असा आरोप फिरोज शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी केला. (lawyer of Feroz Sheikh alleges human rights has been violated in arnab goswami case)

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाली. त्यांच्यासोबत फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. त्यापैकी फिरोज शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी शेख यांना रायगड पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोप केला आहे. “फिरोज शेख हे मागील तीन दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत क्वारन्टाईन म्हणून एका शाळेत आहेत. ते तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर आहेत. त्यांना पोलिसांनी कपडेसुद्धा बदलायला दिलेले नाहीत,” असा आरोप शेख यांच्या वकील अ‌ॅड. नेहा राऊत यांनी केला. तसेच, पोलिसांकडून आलेले पेपर घेण्यासाठी त्यांना शाळेबाहेर कित्येक तास ताटकळत उभं राहांव लागतं. पोलिसांकूडन सहकार्य होत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. फिरोज शेख यांना वकिलांना भेटू दिलं जात नाही. वकिलांना आरोपी सारखी वागणूक मिळत आहे असा आरोप करत; पोलिसांकडून मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलीबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यांना जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून त्यांनी आज (6 नोव्हेंबर) न्यायालयाच याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही उद्या (7 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालय आणि अलिबाग सत्र न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

अर्णव गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच, आजची रात्र शाळेत, उद्या पुन्हा सुनावणी

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

(lawyer of Feroz Sheikh alleges human rights has been violated in arnab goswami case)


Published On - 11:03 pm, Fri, 6 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI