LIVE : शिवसेनेचं संख्याबळ 62 वर

LIVE : शिवसेनेचं संख्याबळ 62 वर

[svt-event title=”शिवसेनेचं संख्याबळ 62 वर” date=”30/10/2019,4:03PM” class=”svt-cd-green” ] साक्री विधानसभा मतदार संघातील भाजपच्या बंडखोर अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा शिवसेनेला पाठिंबा. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले पाठींब्याचे पत्र. विधानसभेत अपक्षांच्या पाठिंब्यासह शिवसेना गटाची संख्या पोचली 62 वर [/svt-event] [svt-event title=”लवकरच शपथविधी : चंद्रकांत पाटील” date=”30/10/2019,3:57PM” class=”svt-cd-green” ] देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते विधीमंडळ नेतेपदी निवड […]

सचिन पाटील

|

Oct 30, 2019 | 4:04 PM

[svt-event title=”शिवसेनेचं संख्याबळ 62 वर” date=”30/10/2019,4:03PM” class=”svt-cd-green” ] साक्री विधानसभा मतदार संघातील भाजपच्या बंडखोर अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा शिवसेनेला पाठिंबा. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले पाठींब्याचे पत्र. विधानसभेत अपक्षांच्या पाठिंब्यासह शिवसेना गटाची संख्या पोचली 62 वर [/svt-event]

[svt-event title=”लवकरच शपथविधी : चंद्रकांत पाटील” date=”30/10/2019,3:57PM” class=”svt-cd-green” ] देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. राज्यात लवकरच सत्तास्थापनेचे समीकरण पूर्ण होणार असून, शपथविधी लवकरच होणार आहे -चंद्रकांत पाटील [/svt-event]

[svt-event title=”माझी निष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर : गीता जैन” date=”30/10/2019,3:53PM” class=”svt-cd-green” ] प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की आपल्या संख्या बळ वाढवायचं मी बंडखोरी केली अपक्ष म्हणून निवडून आले पण माझी निष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यामुळेच भाजपाला मी पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांची पक्षनेते म्हणून निवड झाल्याबद्दल मला आनंद आहे – गीता जैन, अपक्ष आमदार [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील : गिरीश बापट” date=”30/10/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातली सत्तास्थापनेचे समीकरणं आठवडाभरात पूर्ण होणार, असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा ठाम विश्वास आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी बोलताना व्यक्त केले. [/svt-event]

[svt-event title=”पुढील 5 वर्षात यापेक्षा चांगलं काम करणार – देवेंद्र फडणवीस” date=”30/10/2019,3:07PM” class=”svt-cd-green” ] सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी आपली जडण-घडण, गेल्या 5 वर्षात जे काम केलं त्यापेक्षा चांगलं काम पुढील 5 वर्षात करायचं आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे – देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”हे महायुतीचं सरकार – देवेंद्र फडणवीस” date=”30/10/2019,3:03PM” class=”svt-cd-green” ] महायुती म्हणून आपण निवडणूक लढलो, जनतेने महायुतीला कौल दिला, राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. कोणत्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. उत्तम सरकार पुन्हा स्थापन होईल – देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटलांच्या प्रस्तावाला 11 आमदारांचं अनुमोदन” date=”30/10/2019,2:50PM” class=”svt-cd-green” ] देवेंद्र फडणीस यांच्या विधीमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव – सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांचं अनुमोदन [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा” date=”30/10/2019,2:53PM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला” date=”30/10/2019,2:43PM” class=”svt-cd-green” ] आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर काँग्रेस सरकार पुन्हा आलं. पाच वर्ष सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला. [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील यांचं भाषण” date=”30/10/2019,2:40PM” class=”svt-cd-green” ] वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत. [/svt-event]

[svt-event title=” चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निरीक्षकांचे स्वागत केले. ” date=”30/10/2019,2:39PM” class=”svt-cd-green” ] चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निरीक्षकांचे स्वागत केले. [/svt-event]

[svt-event title=”सत्ता स्थापनेत आमचा काहीही रोल नाही : पृथ्वीराज चव्हाण” date=”30/10/2019,2:25PM” class=”svt-cd-green” ] सत्तेसाठी भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. पण जर काही प्रस्ताव सेनेनं दिला तर त्यावर काँग्रेस विचार करील. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकार बनवून लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. सत्ता स्थापनेत आमचा काहीही रोल नाही. भाजप सेनेनं ठरवायचं आहे सरकार कसं स्थापन करायचं. दोघांच्या भांडणात जनतेचे नुकसान होऊ नये ही अपेक्षा. काही झालं तरी दबावतंत्र वापरुन भाजप सेनेला बरोबर घेऊ शकतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”भाजपची नेता निवडीची लगबग, मातोश्रीवर शिवसेनेची खलबते” date=”30/10/2019,2:11PM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 12 वाजता शिवसेनाभवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. आदित्य ठाकरे यांचा उद्या होणारा नियोजित कोकण दौरा रद्द करण्यात आलाय. सध्या ‘मातोश्री’वर पक्षनेत्यांची खलबते सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार” date=”30/10/2019,2:09PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे विधीमंडळ पक्षनेते होणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रस्ताव मांडणार, 10 आमदार त्याला अनुमोदन देणार [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल” date=”30/10/2019,2:02PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल, फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचे सर्व आमदार भगवे फेटे घालून विधानभवनाच्या पायर्‍यांवर, भाजपचा जयघोष करत स्वागत, पंकजा मुंडे, नारायण राणे, रामदास आठवले, विनायक मेटे यांचीही उपस्थिती. [/svt-event]

[svt-event title=”रिझर्व्ह बँकेकडून पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर दंडात्मक कारवाई ” date=”30/10/2019,1:22PM” class=”svt-cd-green” ] रिझर्व्ह बँकेकडून जळगावमधील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पीपल्स बँकेवर तब्बल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”आमदार नितेश राणे पंकजा मुंडेंच्या भेटीला ” date=”30/10/2019,1:07PM” class=”svt-cd-green” ] आमदार नितेश राणे यांनी आज भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. पंकजा मुंडे यांनी भाजपचे तरुण आमदार म्हणून निवडून आला आहात, अशा शब्दात कौतुक करत आमदार नितेश राणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. [/svt-event]

[svt-event title=”छत्तीसगड येथे तीन नक्षलवाद्यांना अटक ” date=”30/10/2019,1:03PM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड येथे तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बीएसएफ जवानांनी अटक केली आहे. भुसुरुंग स्फोट लावण्यासाठी हे नक्षलवादी आले होते. दोन बंदुकासह स्फोट पदार्थ जप्त केले आहे. कांकेर जिल्ह्यातील रावघाट जंगलातून अटक करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”डोंबिवलीत फेरिवाल्यांना मनसेचा इशारा” date=”30/10/2019,1:00PM” class=”svt-cd-green” ] डोंबिवलीत फुटपाथवर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी मनसेने फेरिवाल्यांना इशारा दिला. मनसे कार्यकर्त्यांना पाहून महापालिका कर्मचाऱ्यांची फेरीवाल्यांवर कारवाई सुरु झाली आहे. दोन दिवसात स्टेशन परिसर मुक्त न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात राष्ट्रवादीकडून चंपा साडी सेंटरचे उद्घाटन” date=”30/10/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात राष्ट्रवादीकडून चंपा साडी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमध्ये साडी वाटप करुन निषेध करण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=” पंढरपुरात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण ” date=”30/10/2019,12:52PM” class=”svt-cd-green” ] थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी पंढरपुरात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरु, पंढरपुरातील भाजप नेते व साखर कारखानदार कल्याणराव काळे यांच्या सिताराम आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचा थकीत 13 कोटी रूपयांच्या ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादच्या बजाज नगर परिसरात गॅस स्फोट ” date=”30/10/2019,10:47AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या बजाज नगर परिसरात एका घरात गॅसचा स्फोट झाला. स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. बजाजनगरातील इंद्रप्रस्थन कॉलनीत ही घटना घडली. ऐन दिवाळीत स्फोट होऊन घर जळाल्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. बळीराम तवर यांच्या घरात हा स्फोट झाला. [/svt-event]

[svt-event title=”पाच तारखेपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे : राजू शेट्टी ” date=”30/10/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] येत्या 5 तारखेपर्यंत सरकारने नकुसानग्रसत् शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. वेळे प्रसंगी कायदा हातात घेऊ, रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला. [/svt-event]

[svt-event title=”वाहतूक नियम पाळणाऱ्यांना पोलिसांकडून अनोखी भेट ” date=”30/10/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ] वाहतूक नियम पाळणाऱ्यांना पोलिसांकडून अनोखी भेट देण्यात आली आहे. पोलिसांच्या आभार उपक्रमामुळे लोकांना खरेदीत सवलत मिळाली आहे. 45 हजार लोकांना ही भेट देण्यात आली आहे. नियमांचे एकदाही उल्लंघन न करणाऱ्या 45 हजार वाहन चालकांना आभार कूपन, हॉटेलिंग आणि मिठाई खरेदीसाठी नागरिकांना दहा टक्के सवलत दिली. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवड परिसरात 45 वर्षीय व्यक्तीची हत्या ” date=”30/10/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड परिसरातील आकुर्डी भागात 45 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. येशू मुर्गन दास असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने राहत्या घरात घुसून हत्या केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत. [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें