Lockdown 5.0 | शिर्डी रेड झोनमध्ये, साईबाबा मंदिर उघडण्याबाबत अनिश्चितता

Lockdown 5.0 | शिर्डी रेड झोनमध्ये, साईबाबा मंदिर उघडण्याबाबत अनिश्चितता

ग्रीन झोनमध्ये असलेली शिर्डी आता रेड झोनमध्ये आल्याने मंदिर कधी सुरु होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.

Nupur Chilkulwar

|

May 31, 2020 | 3:47 PM

शिर्डी : केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे 8 जूननंतर काही (Shirdi Saibaba Temple) अटीशर्तींसह देशातील धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी साईमंदिर कधी खुले होणार याची आस तमाम साईभक्तांना आहे. मात्र, ग्रीन झोनमध्ये असलेली शिर्डी आता रेड झोनमध्ये आल्याने मंदिर कधी सुरु होणार याबाबत अनिश्चितता (Shirdi Saibaba Temple) कायम आहे.

कोरोनाचं संकट अवघ्या जगावर असताना शिर्डीत मात्र कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, अखेर कोरोनाचा शिरकाव शिर्डीत झाला आणि अवघं चित्रच बदललं. चार दिवसांपुर्वी शिर्डी जवळील निमगाव-कोऱ्हाळे येथील भाजी विक्रेती महिला कोरोनाबाधित आढळली. त्यानंतर तिच्या संपर्कातील आणि कुटुंबातील आणखी सहा जण कोरोनाबाधित आढळून आले.

शिर्डीतील रहिवासी असलेली महिलेची विहीन कोरोनाबाधित आढळली आणि एकच खळबळ उडाली (Shirdi Saibaba Temple). जिल्हा प्रशासनाने निमगाव-कोऱ्हाळे आणि शिर्डी शहर 12 जूनपर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलं. त्यामुळे साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोपर्यंत आदेश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत मंदिर खुले होणार नसल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितलं.

शिर्डीचं अर्थकारण हे पुर्णपणे साई मंदिरावर अवलंबून आहे. त्यामुळे मंदिर जोपर्यंत सुरु होत नाही, तोपर्यंत शिर्डीचं अर्थचक्र ठप्पच राहणार आहे. व्यवासायिकांना ही अपेक्षा होती की मंदिर लवकरच सुरु होईल, मात्र शिर्डी कंटेन्मेंट झोन घोषित झाल्याने व्यापारी वर्गाच्या इच्छेवर विर्जन पडलं आहे.

देश आणि विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डीला मात्र कोरोनाचं ग्रहण लागलं आहे. साईबाबांचं मंदिर लवकर खुले होईल, अशी इच्छा अनेक भक्तांची आहे. आजही मंदिर बंद असले, तरी ऑनलाईनच्या माध्यमातून लाखो साईभक्त घरबसल्या दर्शनाचा लाभ घेत (Shirdi Saibaba Temple) आहेत.

संबंधित बातम्या :

Lockdown 5.0 | हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील स्थगिती कायम, मुंबई मेट्रोही बंदच

PM Narendra Modi | देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद : पंतप्रधान मोदी

Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5 मध्ये या 10 गोष्टी पाळाव्याच लागणार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें