आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील स्थगिती कायम, मुंबई मेट्रोही बंदच

(International Air Passenger flights Mumbai Metro to remain suspended in Lockdown 5)

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील स्थगिती कायम, मुंबई मेट्रोही बंदच

नवी दिल्ली : देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरु झाली असली, तरी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणांवर तूर्तास बंदी कायम आहे. 30 जूनपर्यंत बंदी आंतरराष्ट्रीय विमानांचे देशातून उड्डाण किंवा आगमन होणार नसल्याचे निर्देश हवाई वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. तर मुंबई मेट्रोही बंदच राहणार आहे. (International Air Passenger flights Mumbai Metro to remain suspended in Lockdown 5)

आंतरराष्ट्रीय कार्गो विमानांना आधीपासूनच स्थगितीतून सूट देण्यात आलेली आहे. केंद्राने काल पहिल्या ‘अनलॉक’ची नियमावली जाहीर करताना आंतरराष्ट्रीय विमान सेवांबाबत तिसऱ्या टप्प्यात विचार करण्याचे सूतोवाच केले. केंद्राच्या निर्णयानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाने परिपत्रक जारी केले.

हेही वाचा : Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5 मध्ये या 10 गोष्टी पाळाव्याच लागणार!

चौथ्या लॉकडाऊनच्या शेवटानंतर ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करताना प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात शिथिलता देण्यात येत आहे. देशात 25 मार्चला लॉकडाऊन लागू झाल्यापासून रेल्वे, रस्ते आणि हवाई अशी सर्व प्रकारची वाहतूक स्थगित करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे, रस्ते आणि देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरु झाली. मात्र आंतरराष्ट्रीय सीमा प्रवाशांसाठी इतक्यात खुल्या होणार नाहीत.

दुसरीकडे, मुंबई मेट्रोची सेवा तूर्तास बंदच राहणार आहे. अनिश्चित काळासाठी मेट्रोसेवा बंद राहणार असल्याचं स्पष्टीकरण मुंबई मेट्रोने दिलं. प्रवास करताना प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी मुंबई मेट्रोने नवीन पर्यायी आसन व्यवस्था केली आहे.

संबंधित बातम्या 

Lockdown 5.0 | हॉटेल, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल्स कधी उघडणार? कुठे काय सुरु, काय बंद?

Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?

LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी

(International Air Passenger flights Mumbai Metro to remain suspended in Lockdown 5)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *