AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश

घटनात्मक तरतुदीनुसार आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी 16 मार्च रोजी विश्वासमत चाचणीला सामोरे जा, असे आदेश मध्यप्रदेशच्या राज्यपालांनी कमलनाथ सरकारला दिले आहेत. Kamalnath Government Floor Test

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश
| Updated on: Mar 15, 2020 | 12:27 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला उद्या (सोमवार 16 मार्च) विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांना विश्वासमत चाचणीचं आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. (Kamalnath Government Floor Test)

फ्लोअर टेस्ट 16 मार्चलाच पूर्ण करावी लागेल. ही चाचणी स्थगित, विलंबित किंवा निलंबित केली जाऊ शकत नाही, असंही राज्यपालांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सूचनेनुसार सहा मंत्र्यांची कॅबिनेटमधून हकालपट्टी करण्यात आली आहे, असा उल्लेखही राज्यपाल टंडन यांनी पत्रात केला आहे.

‘आपण (कमलनाथ) 13 मार्च 2020 रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की आपण विश्वासमत चाचणीसाठी तयार आहात. मला या परिस्थितीबद्दल मुख्य विरोधीपक्ष भाजपकडून एक पत्रही मिळालं आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांवर आणि इतर आमदारांवरही राज्य सरकार अनावश्यक दबाव आणत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.’ असं पत्रात म्हटलं आहे.

काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता नाही, ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश

‘तुमच्या सरकारने सदनाचा विश्वास गमावला असून ते अल्पमतात आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. घटनात्मक तरतुदीनुसार आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी 16 मार्च रोजी, माझ्या संबोधनानंतर तुम्ही विधानसभेत विश्वास मत घ्यावे’ असं राज्यपालांनी पत्रात सांगितलं आहे.

कमलनाथ यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होतं. “कृपया केंद्रीय गृहमंत्री म्हणून आपली शक्ती वापरा, ज्यायोगे बंदिस्त असलेले काँग्रेसचे 22 आमदार मध्य प्रदेशात सुरक्षितपणे पोहोचू शकतील आणि 16 मार्चपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता भाग घेतील,” असं काँग्रेसने पत्रकात म्हटलं होतं.

मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. शिंदेंपाठोपाठ सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. (Kamalnath Government Floor Test)

मध्य प्रदेश विधानसभेचं गणित

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. दोन आमदारांचं निधन झाल्याने ही संख्या 228 वर पोहोचली आहे. इथे बहुमताचा आकडा 115 आहे. काँग्रेसकडे 114 आमदार होते, त्यापैकी 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसला 4 अपक्ष आणि 2 बसपा, 1 सपा आमदाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ (114 + 7 – 22 = 99) वर पोहोचलं आहे.

दुसरीकडे भाजपकडे 107 आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाजूचे तब्बल 22 आमदार राजीनामा देऊन भाजपला साथ देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचं सरकार अल्पमतात येऊ शकतं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.