कार झाडावर धडकून भीषण अपघात, चौघा राष्ट्रीय हॉकीपटूंचा करुण अंत

ध्यानचंद करंडक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना कार झाडावर धडकून मध्य प्रदेशातील चौघा राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा मृत्यू झाला.

कार झाडावर धडकून भीषण अपघात, चौघा राष्ट्रीय हॉकीपटूंचा करुण अंत

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण
गंभीर जखमी आहेत. ध्यानचंद्र ट्रॉफी खेळण्यासाठी जाताना (Madhya Pradesh Hockey Player Accident) हा अपघात घडला.

मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ आज (सोमवारी) सकाळी हा अपघात झाला. ध्यानचंद करंडक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हॉकीपटू कारने निघाले होते. इटारसीहून होशंगाबादच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 वर राईसलपूरजवळ त्यांची कार झाडावर धडकली.

रात्री मॉडेलिंग, दिवसा घरफोड्या, नेपाळी अभिनेत्याला मुंबईत अटक

ही धडक इतकी भीषण होती, की चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मृत हॉकीपटूंची नावं अद्याप पोलिसांनी सांगितलेली नाहीत. वाहनचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडावर
धडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI