महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती, उद्धव ठाकरेंचा निर्णय

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (Mahapariksha Portal exam postponed) आहे.

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती, उद्धव ठाकरेंचा निर्णय

मुंबई : सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात (Mahapariksha Portal exam postponed) होते. याच पार्श्वभूमीवर महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (Mahapariksha Portal exam postponed) आहे. तसेच पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष म्हणजे या त्रुटी दूर झाल्यानतंर परीक्षा या महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जातील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले (Mahapariksha Portal exam postponed) आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापरीक्षा पोर्टलबाबत अनेक तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान विभागाने आढावा बैठक आयोजित केली होती. त्याच पार्श्वभूमीवर महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे.

यात राज्य शासनाच्या विविध विभागातील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धती बाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रार धारकांसोबत येत्या आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट (Mahapariksha Portal exam postponed) केले.

त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तसेच पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.

दरम्यान काही दिवसांपूर्वी महापरीक्षा पोर्टल बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली होती. “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांमधून महापरीक्षा पोर्टल रद्द झालं पाहिजे ही मागणी सातत्याने पुढे येत आहे. पुन्हा एमपीएससी किंवा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून पारदर्शिपणे या जागांची भरती व्हावी, असं अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणं (Mahapariksha Portal exam postponed) होतं.

युवक काँग्रेसच्यावतीने विधानसभा निवडणुकीच्याआधी आम्ही ‘वेक अप महाराष्ट्र’ नावाचा युवकांचा जाहीरनामा तयार केला होता. त्यात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महापरीक्षा पोर्टल रद्द करु ही मागणी केली होती. आता आमचं महाविकासआघाडीचं सरकार आलं आहे. या सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हे पोर्टल रद्द करण्यात येईल, अशी मला खात्री आहे असे सत्यजित तांबे म्हणाले होते.

Published On - 8:59 pm, Sat, 7 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI