AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या तपासात मुंबई पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं (Manager Statement in Sushant Singh Suicide case).

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग
| Updated on: Jun 21, 2020 | 4:46 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मॅनेजरला तिसऱ्यांदा पोलीस ठाण्यात बोलावलं (Manager Statement in Sushant Singh Suicide case). यानंतर मॅनेजर सिद्धांत पिठानी आज तिसऱ्यांदा वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाला. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होता. विशेष म्हणजे तो शेवटपर्यंत सुशांतसोबत होता. त्यामुळे त्यांच्याकडून पोलीस महत्त्वाची माहिती घेत आहेत. यामुळे तपासाला वेग आल्याचं स्पष्ट होत आहे.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांचे जबाब घेतले आहेत. यात त्याच्या गर्लफ्रेंडपासून तर अगदी घरातील नोकरांपर्यंतचा समावेश आहे. दरम्यान, आज या प्रकरणात सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर अ‍ॅडव्होकेट प्रियांका यांनी काहीही बोलण्यास नकार दिला (Sushant Singh Rajput Suicide Investigation).

यशराज फिल्म्स तर्फे सुशांत सिंह राजपूतसोबत झालेल्या कराराचे कागदपत्र वांद्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. पोलीस या संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने तपास करत आहे. पोलिसांनी सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटला बोलविला आहे.

सुशांत दर दोन वर्षांनी मॅनेजरची टीम बदलायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दर 2 वर्षांनी सुशांत आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मैनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेले जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास सुरु आहे.

पोलिसांनी आतापर्यंत कोणा-कोणाचे जबाब नोंदवले

  • के. ले. सिंग, सुशांतचे वडील
  • नितु सिंग, बहीण
  • मीतू सिंग, बहीण
  • सिद्धार्थ पिठाणी आर्ट डायरेक्ट
  • नीरज, सुशांतचा आचारी
  • केशव, सुशांतचा आचारी
  • दीपेश सावंत, केअर टेकर
  • मुकेश चाब्रा, कास्टिंग डायरेक्टर
  • श्रुती मोदी, बिझनेस मॅनेजर
  • राधिका निहलानी, पीआर
  • रिया चक्रवर्ती, प्रेयसी
  • चावी बनवणारा
  • महेश शेट्टी, मित्र
  • केरसी चावडा, सुशांत वर उपचार करणारे डॉक्टर
  • अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानि, कायदेशीर सल्लागार

Sushant Singh Rajput Suicide Investigation

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब

त्याआधी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली .

सुशांतच्या डायऱ्या जप्त

सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल, तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता. आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

सलमान, करण जोहर, एकता कपूरविरोधात तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप बिहारच्या मुजफ्फरपूर न्यायालयात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput Suicide Investigation

संबंधित बातम्या :

सुशांतप्रमाणे अनेक गायकही आत्महत्या करु शकतात, सोनू निगमचे म्युझिक कंपन्यांवर गंभीर आरोप

Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र

Samir Soni | मी सुद्धा आत्महत्या करु शकलो असतो, पण…. : अभिनेता समीर सोनीची पोस्ट

Manager Statement in Sushant Singh Suicide case

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.