माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा, मराठी कलाकारांकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गाणं समर्पित

'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..' या गाण्याच्या माध्यमातून या कलाकारांनी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांच्या कार्याला मानाचा मुजरा केला (Marathi Celebrities tribute to corona fighters) आहे.

माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा, मराठी कलाकारांकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गाणं समर्पित
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 5:44 PM

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Marathi Celebrities tribute to corona fighters) आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, शेतकरी यासारखे अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी कोरोनाशी दोन हात करत आहेत. या सर्वांच्या कार्याला सलाम करणारे एक गाणे मराठी कलाकारांनी तयार केले आहे.

“तू आहेस म्हणून आम्ही घरी सुरक्षित आहोत, तू आहेस म्हणून हा tu chal gadya tula bhiti kashachi देश लढतोय, तू आहेस म्हणून माणूसपण जगतंय, माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा…तू चाल पुढं…तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही,” असे म्हणतं अभिनेता अमेय वाघ याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या गाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल 32 मराठी कलाकार एकत्र आले आहेत. ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..’ या गाण्याच्या माध्यमातून या कलाकारांनी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांच्या कार्याला मानाचा मुजरा केला आहे. सिनेक्षेत्रात कार्यरत असलेल्या समीर विद्वांस आणि हेमंत ढोमे यांची ही संकल्पना आहे.

या व्हिडीओत अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरु, मृण्मयी देशपांडे यांसारखे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरातूनच हा व्हिडिओ केला आहे.

‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..’ हे मूळ गाणं 1937 साली आलेल्या ‘कुंकू’ या चित्रपटातील आहे. त्यानंतर ‘डबल सीट’ या मराठी चित्रपटात ते वापरण्यात आलं होतं. यानतंर आता पुन्हा एकदा या गाण्याला रिक्रिएट करुन अत्यावश्यक सेवेत काम करण्यांना समर्पित करण्यात आलं (Marathi Celebrities tribute to corona fighters) आहे.

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.